UPSC Civil Services Main 2020 Result : यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण 761 परीक्षार्थी उत्तीर्ण
UPSC Main 2020 result : नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते उत्तीर्ण झाले आहेत.
Civil Services Main 2020 Result: नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते उत्तीर्ण झाले आहेत. तर सुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. (civil services main 2020 result announced check result online on upsc gov in)
UPSC Civil Services Result 2021 Direct Link
खुल्या प्रवर्गातून 263 उमेदवार उत्तीर्ण
नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
निकाल कसा पाहावा ?
♦ सर्वात अगोदर upsc.gov.in या वेबसाईटवर जा
♦ वेबसाईटवर जाऊन निकालाच्या लिंकवर क्लिक करा
♦ तुमच्यासमोर एक पीडीएफ येईल
♦ यामध्ये तुमचा रोल नंबर तसेच नाव सर्च करा
♦ जर तुमचे नाव आणि रोल नंबर यामध्ये असेल तर तुम्ही उत्तीर्ण आहात.
♦ हे पीडीएफ डाऊनलोड करुन सेव्ह करा
180 आयएएस तर 200 आयपीएस जागा भरल्या जाणार
केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. आयोगातर्फे 180 आयएएस, 36 आयएफस, 200 आयपीएस, सेंट्रल सर्व्हिस ग्रप ए 302, ग्रुप बी सर्व्हिस 118 अशा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 836 नुयक्त्या केल्या जाणार आहेत.
इतर बातम्या :
JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार, परीक्षा कधी?
GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत नोंदणीची संधी
वन परिक्षेत्र अधिकारी पदावर अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक, अशा प्रकारे करा अर्ज