कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान जे नको व्हायला होतं तेच घडलं, अनपेक्षित प्रकार

राम नवमीच्या दिवशी आज जे घडायला नको होतं तेच कोलकाताच्या हावडा येथे घडलं आहे. राम नवमीच्या यात्रेदरम्यान मोठा वाद उफाळल्याची माहिती समोर आलीय. या वादातून परिसरातील गाड्यांची जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान जे नको व्हायला होतं तेच घडलं, अनपेक्षित प्रकार
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:00 PM

कोलकाता : देशभरात श्रीराम नवमीच्या (Ran Navami) उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहेत. श्रीराम हे त्यागाचे प्रतिक मानले जातात. त्यांनी शांततेचा संदेश दिला. त्यांनी न्यायाला महत्त्व दिलं. आपल्या प्रजेसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. एक मुलगा म्हणून आपण कसं असावं, एक धनुर्धारी योद्धा म्हणून कसं असावं, एक राजा म्हणून कसं असावं, एक माणूस म्हणून कसं असावं हे श्रीरामांचं चरित्र वाचल्यावर समजतं. पण आज रामजयंतीच्या दिवशीच काही अनपेक्षित अशा घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरात दोन गटातील वाद विकोपाला गेल्याची बातमी ताजी असताना पश्चिम बंगालमधूनही अशीच अनपेक्षित घटना समोर आली आहे.

कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. हावडामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हावडामधील शिवपुरी भागात ही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या तरी परिसरात तणावपूर्ण शांतता दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

रामनवमीच्या निमित्ताने हावडामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोषणाबाजी करण्यावरुन वाद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. या वादातून परिसरातील जाळपोळ करण्यात आली. अनेक गाड्या जाळण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून गाड्यांना लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पोलिसांनी वादावर आता नियंत्रण मिळवल्याची देखील माहिती समोर आली आहे.

गुजरातच्या फतेहपुरात शोभायात्रेवर दगडफेक

दुसरीकडे गुजरातच्या फतेहपुरातही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. फतेहपुरात रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शोभायात्रेत सहभागी असलेले काही भाविक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले.  यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा अंदाज पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी लगेच गदारोळावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केल्यानंतर दगडफेक करणारे समाजकंटक परिसरातून पळून गेले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळाली. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून पुन्हा तसा काही प्रकार घडणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच दगडफेक प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.