Encounters in Jammu and Kashmir: अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवादी ठार

काही दिवसांपासून दहशतवादी पुन्हा एकदा काश्मीरमधील सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहेत. काश्मिरी पंडित राहुल भट यांच्यानंतर अलीकडेच दहशतवाद्यांनी बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची गोळ्या घालून हत्या केली होती.

Encounters in Jammu and Kashmir: अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवादी ठार
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 7:32 PM

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)वाढत्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी ऑपरेशन व्हॅली सुरू केले आहे. अनंतनागमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Clashes between security forces and terrorists) उडाली. अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अजूनही कारवाई सुरू असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले आहे. तर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचेही सांगितले आहे. दरम्यान दिवसांपूर्वी पुलवामा येथे एका दहशतवाद्याचा (Terrorist) खात्मा करण्यात आला होता. त्राल भागातील मगहमा येथे ही चकमक झाली होती. तर दुसरीकडे, बडगाम जिल्ह्यात सीआरपीएफ पार्टीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता.

परिसराची नाकाबंदी

काश्मीर झोन पोलिसांनी माहिती दिली की, अनंतनागच्या बिजबेहारा भागातील शितीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसराची नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचेही सांगितले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी पुन्हा एकदा काश्मीरमधील सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहेत. काश्मिरी पंडित राहुल भट यांच्यानंतर अलीकडेच दहशतवाद्यांनी बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची गोळ्या घालून हत्या केली होती.

काश्मीरमध्ये चकमक आणि दहशतवाद

  1. 17 सप्टेंबर रोजी श्रीनगरच्या बटमालूमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले.
  2. 29 ऑगस्ट रोजी, सुरक्षा दलांनी शनिवारी पहाटे पुलवामाच्या जडूरा भागात तीन दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराचा एक जवान शहीद झाला.
  3. 28 ऑगस्ट रोजी शोपियानच्या किलुरा भागात सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. एकाला अटक करण्यात आली. तो अल बद्र या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता.
  4. 19 ऑगस्ट रोजी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमक झाली. यादरम्यान एक दहशतवादी मारला गेला. त्याच दिवशी हंदवाडा येथील गुनीपोरा येथे दोन दहशतवादी मारले गेले.
  5. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी बारामुल्लाच्या कारीरी भागात ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये लष्कराचे दोन कमांडर सज्जाद उर्फ ​​हैदर आणि उस्मान यांचा समावेश होता. हैदर हा बांदीपोरा हत्येचा मुख्य सूत्रधार होता. तो तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती करत असे. विदेशी दहशतवादी उस्मानने भाजप नेते वसीम बारी, त्याचे वडील आणि भावाची हत्या केली होती.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.