वंदेभारतमध्ये सफाईची पद्धत बदलली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीटरवर पोस्ट केला व्हीडीओ
वंदेभारत एक्सप्रेसमध्ये कचऱ्याचा कसा ढीग पसरला आहे असा फोटो आयएएस अवनीश शरण यांनी ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवा व्हीडीओ शेअर करीत सफाईची पद्धत आता बदलली आहे, सहकार्य करा असे आवाहन केले आहे,
दिल्ली : वंदेभारत एक्सप्रेसमध्ये ( vandebharat ) प्रवासी कचरा करीत असल्याचा फोटो एका आयएएस ( ias ) ऑफीसरने समाजमाध्यमावर व्हायरल केला होता. या फोटोत वंदेभारतचा सफाई कर्मचारी झाडू मारताना दिसत असून कोचमध्ये रिकाम्या बाटल्या, अन्नाची पाकीटे आणि अन्य कचरा पसरलेला दिसत होता. यासंदर्भात भारतीयांच्या कचरा करण्याच्या प्रवृतीवर या आयएएस अधिकाऱ्यांनी मिश्कील टीप्पणी केली होती. त्यावर समाजमाध्यमावर उलट सुलट प्रतिक्रीयाही आल्या होत्या. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल वंदेभारतमध्ये सफाई कर्मचारी प्रवासी कसे शिस्तबद्ध पद्धतीने कचरा गोळा करत आहे, असा व्हीडीओ पोस्ट केला असून सफाईची पद्धत आता बदलली आहे असे म्हटले आहे.
भारतीय प्रवाशांना कचरा करण्याची इतकी सवय झाली आहे, की आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवासी आपला कचरा टाकण्याचा उपक्रम कायम ठेवत असल्याचे आयएएस ( IAS ) अधिकारी अवनीश शरण यांनी समाजमाध्यमावर फोटोसह पोस्ट केले होते. भारतीयांच्या या प्रवृत्तीवर त्यांनी सडकून टीका केली होती. या पोस्टवर समाजमाध्यमावर अनेक उलट सुलट प्रतिक्रीया देखील आल्या होत्या.
Cleaning system changed for #VandeBharat trains. आपका सहयोग अपेक्षित है। https://t.co/oaLVzIbZCS pic.twitter.com/mRz5s9sslU
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 28, 2023
भारतीय रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला एकीकडे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे काही अपवादात्मक घटना घडत आहेत. वंदेभारत एक्सप्रेसच्या एका कोचमध्ये कचऱ्याचा कसा ढीग पसरला आहे असा फोटो आयएएस अवनीश शरण यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरवर पोस्ट केल्याने चर्चेला पेव फुटले. या पोस्टमध्ये वंदेभारत एक्सप्रेसचा कर्मचारी झाडू मारताना दिसत आहे. या ट्रेनची सफाई करताना प्रवाशांनी टाकलेल्या कचऱ्याचा अक्षरश: ढीग दिसत आहे. ज्यात उरलेले अन्नाचे बॉक्स, मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्या यांचा खच पडलेला दिसत होता. हा फोटो ट्वीट करताना या आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शन देताना, ‘आम्ही भारताचे लोक’, असे भारतीय घटनेचे पहिले वाक्य लिहीले होते, या फोटोवर इंटरनेट युजरच्या अनेक मजेशीर प्रतिक्रीया आल्या होत्या. या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव वंदेभारतच्या सफाईचा व्हीडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. त्यात Cleaning system changed for #VandeBharat trains. आपले सहकार्य अपेक्षित आहे अशी कॅप्शन दिली आहे. या व्हीडीओ सफाई कर्मचारी दोन आसनांमधून जात आहे. त्याच्या हातात असलेल्या मोठ्या प्लॅस्टीकच्या पिशवीत प्रवाशांकडील कचरा तो गोळा करताना दिसत आहे,