हवामान बदलामुळे भारतात मोठ्या दुष्काळाची शक्यता, IIT गांधीनगरच्या अभ्यासात दावा
येणाऱ्या काही वर्षात भारताला अचानक मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगरमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात हा धोका वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : हवामान बदलामुळे येणाऱ्या काही वर्षात भारताला अचानक मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचा नकारात्मक परिणाम पिकांवरही पडले. त्यावेळी सिंचनाची मागणी वाढेल पण भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगरमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात हा धोका वर्तवण्यात आला आहे.(Climate change is likely to lead to a major drought in India)
IIT गांधीनगरने केलेल्या अभ्यासानुसार, मातीतील ओलावा मोठ्या गतीने कमी होत आहे. अशावेळी भारतात अचानक मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे येणाऱ्या दुष्काळापेक्षा अचानक पडणाऱ्या दुष्काळामुळे 2 – 3 आठवड्यातच मोठ्या प्रदेशात त्याचा परिणाम जाणवू लागतो. त्यामुळे शेती, पिकांवर त्याचा मोठा परिणाम होईल आणि सिंचनासाठी पाण्याची मागणीही वाढेल. तर जमिनीतील भूजल पातळी खालावत जाईल.
माती परिक्षणातून अभ्यास
IIT गांधीनगरने केलेला अभ्यास NPJ क्लायमेट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यात मान्सूनवेळी पडणाऱ्या दुष्काळाबाबत हवामान बदलाच्या भूमिकेचा अभ्यास करण्यात आला आहे. हवामानात होणाऱ्या या बदलला माणूसच कारणीभूत आहे. या अभ्यासात भारतीय हवामान खात्याकडून गोळा करण्यात आलेल्या मातीचे नमुने आणि हवामानबाबत लावलेले अंदाजाचा वापर केला आहे.
1979 मध्ये सर्वात भीषण दुष्काळ
हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या टीमने यात उल्लेख केला आहे की, 1951 ते 2016 दरम्यान सर्वात भीषण दुष्काळ 1979 मध्ये पडला होता. त्यावेळी देशातील 40 टक्क्यांहून अधिक भाग प्रभावित झाला होता. मान्सूनला येण्यास उशीर झाला तर भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याचं आम्ही पाहिलं आणि भविष्यात अचानक दुष्काळ पडण्याची शक्यता वाढणार आहे, असा दावा IIT गांधीनगरचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक विमल मिश्रा यांनी सांगितलं.
Video | शेतातील गोठ्याला आग, जनावरांसह साहित्य जळून शेतकऱ्याचं 25 लाखांच नुकसानhttps://t.co/RD9XJuVGN7#farmer | #fire | #firebrokeout | #Kajalsara |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
इतर बातम्या :
प्रेमाचं प्रतिक मानलं जाणारा शुभ्र ताजमहाल होतोय हिरवा! काय आहे कारण?
महिलांनो लक्ष असुद्या! अडचणी असाल तर ‘या’ नंबरवर करा फोन, सरकारची मोठी योजना
Climate change is likely to lead to a major drought in India