Amarnath cloudburst Video: अमरनाथ गुफेजवळ ढगफुटी, 15 जणांचा मृत्यू, 10 ते 15 हजार भाविक होते गुफेजवळ
ढगफुटी झाली तेव्हा तिथे १० हजार जण होते, असे सांगण्यात येते आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाकडून आता मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीर : अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी झाली आहे. यात पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported. Rescue operation underway by NDRF, SDRF & other agencies
(Source: ITBP) pic.twitter.com/o6qsQ8S6iI
— ANI (@ANI) July 8, 2022
ू काश्मीरमधील अमरनाथ या तीर्थ क्षेत्राजवळ ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत आहे. यात पाच भविकांचा मृत्यू झाला आहे. तर अमरनाथ परिसरात अडकलेल्या भाविकांना पाचवण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरु आहेत.
#WATCH | J&K: Rescue operation underway at lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported. Two people dead so far pic.twitter.com/0pwry9gkJt
— ANI (@ANI) July 8, 2022
मुसळधार पावसामुळे अनिक भाविक अमरनाथ गुहेजवळ अडकून पडले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. भाविकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अमरनाथ मध्ये सध्या बचाव कार्य सुरू आहे. भाविक मुसळधार पावसात अडकले आहेत. पाण्याच्या प्रवाहात अनेक दुकानं वाहून गेली आहेत.
#WATCH | J&K: Massive amount of water flowing turbulently after a cloud burst occurred in the lower reaches of Amarnath cave. Rescue operation is underway at the site pic.twitter.com/w97pPU0c6k
— ANI (@ANI) July 8, 2022
शुकवारी संध्याकाळी ५. ३० च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी गुफेजवळ १० ते १५ हजार भाविक उपस्थित होते, अशी माहिती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ते ६ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मृतांचा आकडा 15 वर पोहचला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दोनच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported at around 5.30 pm. Rescue operation underway by NDRF, SDRF & other associated agencies. Further details awaited: Joint Police Control Room, Pahalgam
(Source: ITBP) pic.twitter.com/AEBgkWgsNp
— ANI (@ANI) July 8, 2022
अमरनाथ गुफेपासून दोन किलोमीटर अंतरावर ढगफुटीचा प्रकार घडला. डोंगरातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहानं भाविकांचे २५ टेंट आणि काही दुकाने वाहून गेल्याची माहिती आहे. या पाण्याच्या प्रवाहानं काही वेळातच तिथे पाणी पातळी वाढली, यात भाविकांचे सामानही खराब झाल्याची माहिती आहे.
अमरनाथ परिसरात सतत सुरु असलेल्या पावसात ही ढगफुटी घटना घडली आहे. ढगफुटीनंतर सिंध नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. भाविकांना सुरक्षित ठिकाणी छावणीत पोहचवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.