मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत निती आयोगाची (Niti Aayog) सातवी बैठक आज पार पडली. नीती आयोगाची ही बैठक नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पार पडली. या बैठकीला देशातील जवळपास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपस्थित राहिले. या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र अनुपस्थित राहिले. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदींनी पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली. मात्र, या बैठकीतील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. निती आयोगाच्या बैठकीचा एक फोटो समोर आलाय. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केलीय.
Union Minister Shri @nitin_gadkari Ji participated in the 7th NITI Aayog Governing Council Meeting under the Chairmanship of Hon’ble PM Shri @narendramodi Ji along with State Chief Ministers and Union Cabinet Ministers. pic.twitter.com/uaTIWZIUSB
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) August 7, 2022
रोहित पवार यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
चर्चेत आलेल्या या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदी नेते पहिल्या रांगेत पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या आणि शेवटच्या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळत आहेत.