कोरोनाची लस मोफत देण्याची केरळच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा, भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन केरळमधील सर्व नागरिंकाना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती.

कोरोनाची लस मोफत देण्याची केरळच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा, भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 6:54 PM

कोची : कोरोना या संसर्गाने संपूर्ण जगाला वर्षभरापासून वेठीस धरले आहे. या आजारावर आता लस येणार आहे. काही देशांमध्ये लसीकरण सुरु झाले आहे, तर काही ठिकाणी लवकरच लसीकरणास सुरुवात केली जाणार आहे. भारतातही लवकरच कोरोनावरील लस (Corona Vaccine) उपलब्ध होण्याची चिन्ह आहेत. अशा परिस्थितीत ही लस किती रुपयांना मिळणार? आणि लस आधी कोणाला मिळणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मोठी घोषणा केली आहे. केरळमधील सर्व नागरिंकाना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा विजयन यांनी शनिवारी (12 डिसेंबर) केली आहे. दरम्यान, विजयन यांच्या या घोषणेनंतर केरळमध्ये विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसलेल्या युडीएफ (United Democratic Front) युतीने आणि भारतीय जनता पक्षाने थेट निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. (CM Pinrayi Vijayan announced free corona vaccine, BJP- Congress filed complaint in Election Commission)

केरळमधील विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीबाबत केलेली घोषणा ही आचारसंहितेचं उल्लंघन आहे. कारण केरळमधील उत्तरेकडील चार जिल्ह्यांमध्ये 14 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (Communist Party of India – Marxist) विरोधी पक्षांच्या या कृतीला बालिश म्हटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, अशा प्रकारची घोषणा करुन मुख्यमंत्री विजयन यांनी मतदारांना प्रलोभित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. दरम्यान, सीपीएमचे प्रभारी सचिव ए. विजयराघवन यांनी त्रिशूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांची घोषणा ही राज्यात सुरू असलेल्या कोविड -19 वरील उपचारांसंबंधीच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

या राज्यांमध्ये मोफत लस

केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्याअगोदर भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये राज्यातील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता. यावेळी भाजपने बिहारी जनतेला मोफत कोरोना लसीचं आश्वासन दिलं होतं. बिहारनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीदेखील तामिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली होती. यामध्ये आता केरळ राज्याचाही समावेश होणार आहे.

तामिळनाडूप्रमाणे आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी घोषणा केली होती की, राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे. तसेच तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंद्र यांनी घोषणा केली होती की, राज्यातील गरीब नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल.

देशात कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 8 डिसेंबर रोजी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (Serum) भेटी दिली होती. या भेटीनंतर त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविशील्ड ही लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना कोविशील्ड अवघ्या 250 रुपयांत उपलब्ध होणार आहे.

कोविशील्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी सीरम कंपनीने नुकतीच केंद्र सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच सीरमला लशीच्या वापरासाठी परवानगी मिळू शकते. मात्र, त्यापूर्वी मोदी सरकार सीरम कंपनीशी करार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

‘सीरम’च्या लशीची किंमत बाजारपेठेत जास्त

‘सीरम’कडून आतापर्यंत S11 लशीचे 4 कोटी डोस तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या लशीला असणारी मागणी पाहता कोविशील्डच्या 20 कोटी डोसची निर्मिती करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि वृद्ध व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचे ठरवले आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कोविशिल्डचे दोन डोस देणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या यादीतील 3 कोटी लोकांसाठी 6 कोटी डोसची गरज आहे. ही लस साधारण मार्च ते एप्रिल महिन्यात बाजारपेठेत उपलब्ध होईल. खुल्या बाजारपेठेत या लशीची किंमत 500 ते 600 रुपये इतकी असेल.

लसी भरपूर, पण आधी कुठली लस येणार?

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राजेनिका यांनी मिळून कोविशिल्ड ही लस बनवली. तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरल्या आहेत. मात्र, अ‍ॅस्ट्राजेनिकाने पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्याचं ठरवल्याने या लसीला काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. या लसीचं उत्पादन पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट करत आहे.

दुसरीकडे, फायझर या अमेरिकन कंपनीची लसही 94 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली आहे. ही लस नागरिकांना देण्यासाठी ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये लवकरच ही लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. याच धर्तीवर भारतातही लसीकरणाला परवानगी देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

संबंधित बातम्या

Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश

30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती

(CM Pinrayi Vijayan announced free corona vaccine, BJP- Congress filed complaint in Election Commission)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.