Rakshabandhan : रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री योगी यांच्याकडून मुलींना गिफ्ट, आता १५ हजारांऐवजी मिळणार इतके हजार

या योजनेमुळे शिकू शकत आहे. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. या योजनेच्या माध्यमातून मी आपले स्वप्न पूर्ण करू शकणार आहे.

Rakshabandhan : रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री योगी यांच्याकडून मुलींना गिफ्ट, आता १५ हजारांऐवजी मिळणार इतके हजार
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 6:49 PM

लखनौ, 30 ऑगस्ट 2023 : रक्षाबंधनानिमित्त उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलींसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. कन्या सुमंगला योजनेच्या मदतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. आधी या योजनेअंतर्गत मुलींना १५ हजार रुपये मिळत होते. यात वाढ करून ही मदत २५ हजार रुपये करण्यात येणार आहे. तशाप्रकारचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं. कन्या सुमंगला योजनेअंतर्गत आधी सहा टप्प्यात उत्तर प्रदेशातील मुलींना १५ हजार रुपये दिले जात होते. आता पुढील वर्ष जन्म घेणाऱ्या मुलींच्या खात्यात सुरुवातीला पाच हजार रुपये ट्रान्सफर केले जातील. मुलगी एक वर्षाची झाल्यानंतर दोन हजार रुपये, मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर तीन हजार रुपये, सहाव्या वर्गात गेल्यानंतर तीन हजार रुपये दिले जातील. मुलगी नवव्या वर्गात गेल्यानंतर पाच हजार रुपये आणि मुलगी पदवी किंवा डिप्लोमा कोर्स करत असेल तर तिच्या खात्यात सात हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातील.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, सध्या या योजने अंतर्गत १६ लाख २४ हजार मुलींना फायदा मिळत आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या माध्यमातून मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी फायदा होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची घोषणा केली. या योजनेतून देशाला मोठा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मुलीकडून राखी बांधून घेताना योगी आदित्यनाथ

कार्यक्रमात सहभागी कन्या सुमंगला योजनेच्या लाभार्थी असलेल्या काही मुलींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राखी बांधली. मुख्यमंत्री योगी यांनी मुलींना भेटवस्तू देऊन मोठे वचन दिले. मुख्यमंत्री योगी यांच्या एका क्लीकवरून २९ हजार ५२३ मुलींना ५ कोटी ८२ लाख रुपये ट्रान्सभर करण्यात आले.

cm 2 n

रत्ना करणार स्वप्न साकार

योजनेच्या लाभार्थी रत्ना मिश्रा म्हणाल्या, या योजनेमुळे ती शिकू शकत आहे. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. या योजनेच्या माध्यमातून मी आपले स्वप्न पूर्ण करू शकणार आहे. कारण मुख्यमंत्री योगी यांनी मुलींना पैशाची मदत देऊन मोठे गिफ्ट दिले आहे.

लाभार्थी अक्षरा म्हणाली,…

दहावीची विद्यार्थिनी अक्षरा कुशवाहा हिने सांगितले की, गरीब मुलींच्या जीवनात या योजनेमुळे मोठे पाठबळ मिळाले आहे. या योजनेमुळे गरीब मुली शिकू शकत आहेत. मुलांच्या बरोबरीने स्पर्धा करू शकत आहेत. याबद्दल कुशवाहा हिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.