कोविशील्ड पाठोपाठ कोव्हॅक्सिन लसीचे दर ठरले; राज्यांना 600 रुपयांत, तर खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांत मिळणार
भारत बायोटेकने आज लसीच्या नव्या दरांची घोषणा केली आहे. कंपनीने लसीचा निर्यात दर 15 ते 20 डॉलर इतका निश्चित केला आहे. (Co-vaccine vaccine rates declaired; States will get Rs 600, while private hospitals will get Rs 1,200)
नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्युटने कोविशील्ड लसीचे सुधारित दर जाहीर केल्यानंतर आता कोवॅक्सिन या स्वदेशी लसीचे नवीन दर जाहीर झाले आहेत. ही लस राज्य सरकारांना 600 रुपयांत तर खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांत मिळणार आहे. भारत बायोटेकने आज लसीच्या नव्या दरांची घोषणा केली आहे. कंपनीने लसीचा निर्यात दर 15 ते 20 डॉलर इतका निश्चित केला आहे. (Co-vaccine vaccine rates declaired; States will get Rs 600, while private hospitals will get Rs 1,200)
कोव्हॅक्सिन लस जगातील सर्वाधिक यशस्वी लसीमध्ये सामील
कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) प्रयत्नांतून विकसित झालेली स्वदेशी लस आहे. ही लस सध्या जगातील सर्वाधिक यशस्वी लसींच्या यादीत सामील झाली आहे. लसीचा क्लिनिकल प्रभावीपणा 78 टक्के आहे, असा दावा कंपनीने फेज-3 क्लीनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे केला आहे. म्हणजेच ही लस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात 78 टक्के प्रभावी आहे. चाचणीदरम्यान ही लस ज्या ज्या लोकांना टोचण्यात आली होती, त्यातील कुणामध्येही कोरोनाची गंभीर लक्षणे दिसली नव्हती. याच आधारे ही लस कोरोनाचा संसर्ग रोखण्यात 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला.
कोवॅक्सिनचे उत्पादन वाढवले जाणार
भारत बायोटेकने अलीकडेच कोवॅक्सिन लसीचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक वर्षी लसीचे जवळपास 70 कोटी डोस तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने निर्धारित केले आहे. कंपनीने आपल्या हैदराबाद आणि बंगळुरूतील काही प्लांटची क्षमता वाढवली आहे. कमाल मर्यादेपर्यंत लसीचे उत्पादन पोचवण्यासाठी 2 महिन्यांचा अवधी लागणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी भारत बायोटेक कंपनीला 1,567.50 कोटी रुपये आगाऊ रक्कम देण्याची घोषणा केली आहे.
प्रत्येक महिन्याला 5 कोटी 35 लाख डोस तयार करणार
कंपनीने जुलैपासून प्रत्येक महिन्याला 5 कोटी 35 लाख डोस तयार करण्याचे पाऊल टाकले आहे. कंपनी इनएक्टिवेटेड लस बनवते. अशा प्रकारची लस सुरक्षित असते. या प्रकारची लस सुरक्षित आहे, परंतु यात बरीच गुंतागुंत आहे. ही तयार करणे देखील महाग आहे.
कोविशील्डने नुकतेच ठरवलेले नवीन दर
सिरम इन्स्टिट्यूटने गेल्या बुधवारीच कोविशील्ड लसीचे नवीन दर जाहीर केले आहेत. या लसीच्या सुधारित दारपत्रकानुसार, कोविशील्डचे डोस खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांत, राज्य सरकारांना 400 रुपयांत आणि केंद्र सरकारला आधीप्रमाणेच 150 रुपयांत मिळणार आहेत. लसीच्या एकूण उत्पादनापैकी 50% डोस केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी पाठवले जातात. उर्वरित 50% लसी राज्य सरकारांना आणि खाजगी रुग्णालयांना दिले जातात. (Co-vaccine vaccine rates declaired; States will get Rs 600, while private hospitals will get Rs 1,200)
Video | फुलपाखराचं ऑपरेशन कधी पाहिलंत ?, नसेल तर हा खास व्हिडीओ पाहाचhttps://t.co/tah73KUWm5
#VIDEO |#Video | #Viral |#ViralVideo | #butterflies | #butterfly
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2021
इतर बातम्या
बहीण प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं, भाऊ धनंजय मुंडेंची भावनिक प्रार्थना म्हणाले…
CBI raid on Anil Deshmukh Live : सीबीआयचा राजकीय वापर होताय : जयंत पाटील