जिल्हाधिकाऱ्यांची कार सुस्साट, तिघांना उडवले, रस्त्यावर दिसले भयानक दृश्य

अपघात झालायचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची मोडतोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची कार सुस्साट, तिघांना उडवले, रस्त्यावर दिसले भयानक दृश्य
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 6:49 PM

बिहार | 21 नोव्हेंबर 2023 : बिहारमधील मधेपुरा जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव येणाऱ्या कारने तीन जणांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची मोडतोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांची पोलिसांनी समजूत काढत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी यांनी गाडीमध्ये जिल्हाधिकारी होते असे सांगितले. तर, पोलिसांनी जिल्हाधिकारी गाडीत उपस्थित नव्हते असा दावा केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीणा यांची कार पाटणा येथून मधेपुराला जात होती. ही कार भरधाव वेगाने येत होती. मधुबनीतील फुलपारस पोलीस स्टेशन परिसरात ही कार आली. समोरून येणाऱ्या एका वाहनाला या गाडीने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

रस्त्यावर दिसले भयानक दृश्य

मधेपुरा येथे हा अपघात झाल्याची माहिती कळताच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताचे दृश्य पाहून एकाच आकांत केला. अपघात झाल्यानंतर येथील दृश्य अतिशय भीषण होते. रस्त्यावर मृतदेह विखुरले होते. हा परकर पाहून ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष पसरला.

या अपघाताची माहिती देताना मधेपुराचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार सिंह यांनी, वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हा अपघात कसा झाला हा तपासाचा विषय आहे. हा अपघात झाला तेव्हा जिल्हा दंडाधिकारी गाडीत नव्हते अशी माहिती दिली. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पुढील तपास सुरु आहे असेही ते म्हणाले.

दुसरीकडे, ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी यांनी गाडीमध्ये जिल्हाधिकारी, ड्रायव्हर, एक अंगरक्षक आणि एक मुलगी बसले होते असे सांगितले. अपघात होताच एक दुचाकी तेथे आली आणि त्यांना घेऊन नेली अशी माहितीही त्यांनी दिली..

प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करण्यात येत आहे. सत्य काय आहे ते तपासानंतरच समोर येईल. मात्र, लोकांमध्ये या घटनेनंतर प्रचंड रोष पसरला आहे. ग्रामस्थांनी काही काळ रस्त्यावर घोषणाबाजी केली. परंतु, पोलिसांनी समज देऊन त्यांना शांत केले. मृतांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.