बंगळुरु : भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल 1 मिशनच काऊंटडाऊन सुरु झालय. मागच्या महिन्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. इस्रोच्या या कामगिरीनंतर सर्वांचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारत आता आपल्या पहिल्या सूर्य मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज आहे. भारताला आणि इस्रोला आदित्य एल 1 सूर्य मोहिमेपासून बऱ्याच अपेक्षा आहेत. सतीन धवन अवकाश तळावरुन आदित्य एल 1 मिशनच लॉन्चिंग होणार आहे. PSLV-C57 हे रॉकेट आदित्य एल 1 सॅटलाइट पृथ्वीच्या लोअर ऑर्बिट म्हणजे कक्षेत स्थापित करेल. सकाळी 11 वाजून 50 मिनिटंनी लॉन्चिंग होईल. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये एक एल 1 पॉइंट आहे. त्याला हॅलो ऑर्बिट म्हटलं जातं. तिथे आदित्य एल 1 ला स्थापित केलं जाईल.
या मिशनमधून सूर्याबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल. सूर्याबद्दल माहित नसलेली अनेक रहस्य उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. आदित्य एल-1 च आयुष्य पाच वर्षांच असेल. तो इतकी वर्ष सूर्याभोवती फेऱ्या मारेल. सूर्यावरील वादळं, सूर्यावरील कोरोना आणि अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेऱ्या मारेल. त्यानंतर 15 लाख किलोमीटरचा प्रवास करुन L-1 पॉइंटवर पोहोचेल. या पॉइंटवर फेऱ्या मारताना आदित्य-एल 1 सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल.
नासाच्या सूर्य मिशनचा खर्च इतके हजार कोटी?
इस्रोने आपल्या प्रत्येक मिशनमध्ये नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कमी बजेटमध्ये सूर्य मिशनची आखणी केली आहे. आदित्य मिशनचा खर्च 400 कोटी रुपये आहे. NASA ला सूर्य मोहीमेसाठी 12,300 कोटी रुपये खर्च आला होता. चांद्रयान मोहिम सुद्धा भारताने अत्यंत कमी खर्चात यशस्वी करुन दाखवली होती. फक्त 600 कोटीच्या घरात या मिशनसाठी खर्च आला होता. कमी खर्चात मोहीम यशस्वी करण्याचा भारताचा गुण अनेक देशांना भावला आहे. जगातील अनेक देशांना याच आश्चर्य वाटतं. चांद्रयान-3 च्या यशानंतर जगातील अनेक देशांना इस्रोसोबत काम करायच आहे.