ऑक्सिजनअभावी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

कोविड-19 च्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या तसेच रुग्णालयात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा विविध मागण्याही या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Compensate the families of patients who die due to lack of oxygen; Petition to the Supreme Court)

ऑक्सिजनअभावी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका
supreme court
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:45 PM

नवी दिल्ली : देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न अजून दूर झालेला नाही. रुग्णाला वेळीच तसेच पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. राजधानी दिल्लीप्रमाणेच विविध राज्यांत ऑक्सिजन पुरवठ्याची बोंब आहे. केंद्र सरकारला दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यावरून सर्वोच्च न्यायालय तसेच दिल्ली उच्च न्यायालयाकडून वारंवार फटकारे सोसावे लागत आहेत. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल झाली आहे. देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोविड-19 च्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या तसेच रुग्णालयात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा विविध मागण्याही या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Compensate the families of patients who die due to lack of oxygen; Petition to the Supreme Court)

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाबाबत भरपाईची मागणी करणारी याचिका

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर कहर चालवला आहे. या लाटेचा कहर थांबवायचा कसा हे मोठे आव्हान आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर वाढला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात अनेकदा रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाची प्रकरणे समोर आली आहेत. त्याकडे लक्ष वेधत सर्वोच्च न्यायालयात भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. केंद्र सरकार कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी काय उपाययोजना राबवतेय, तसेच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोणती तयारी करण्यात आली आहे, याचा राष्ट्रीय आराखडा सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. ज्या भागात कोरोनाचा प्रचंड संसर्ग झाला आहे तसेच कोरोनाबळींचे प्रमाण अधिक आहे, तेथील संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कारवाई सुरू करा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

मृत्यूदर वाढल्याने देशाचे टेन्शन वाढले

राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचे भीषण संकट आहे. त्यात गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला. दुसरीकडे कर्नाटकमध्ये व्हेंटीलेटर व ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे 72 तासांत 40 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. चामराजनगर जिल्ह्यात अवघ्या दोन तासांत 24 कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय भरपाईच्या याचिकेवर कोणता निर्णय देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात सध्या दररोज चार लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. मृत्यूदर वाढल्यामुळे देशाचे टेन्शन भलतेच वाढले आहे. (Compensate the families of patients who die due to lack of oxygen; Petition to the Supreme Court)

इतर बातम्या

अक्षय्य तृतीयेवरही लॉकडाऊनचं ग्रहण! ज्वेलर्सनी सोन्याची विक्री करण्यासाठी अवलंबली ही पद्धत

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 100 कोटीचे हेरॉईन जप्त

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.