सचिन, लता मंगेशकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, लोकसभेत अधीर रंजन चौधरींचा घणाघात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांसारख्या महान व्यक्तींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांसारख्या महान व्यक्तींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात बोलणाऱ्या 18 वर्षीय मुलीला शत्रू म्हणायला आपला देश इतका कमकुवत आहे का? असा सवालही अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.(Congress alleges that the central government is misleading Sachin Tendulkar and Lata Mangeshkar)
चौधरी यांनी आरोप केला आहे की ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी परवानगी तुम्ही दिली होती. मग गडबड का झाली? आजपर्यंत आम्हाला त्याबाबत स्पष्ट माहिती नाही. शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन तुम्ही आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करत आहात. कट शेतकऱ्यांनी नाही, तर लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारे सरकारचे लोक होते. तुम्ही आंदोलन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात, असा गंभीर आरोप अधीर रंजन चौधरी यांनी सत्ताधारी भाजपवर केला आहे.
ट्वीट करणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी होणार
पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर देशातील सेलिब्रेटीजचा केंद्रसरकारने गैरवापर केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मला चौकशी करण्याचे व्हिडीओ https://t.co/xgA0jKbdu7 (१/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 8, 2021
भाजपचा हल्लाबोल
सेलिब्रिटीजची चौकशी करण्याच्या गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निर्णयावर टीकस्त्र सोडलं आहे. “भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे”, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी ट्विट द्वारे महाविकास आघाडीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आशिष शेलार आणि अतुल भातखळकर देखील आक्रमक झाले आहेत.
संबंधित बातम्या :
“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”, देवेंद्र फडणवीसांसंह भाजप आक्रमक
‘भाजप नेत्यांनी संस्कार दाखवून दिले’, रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
Congress alleges that the central government is misleading Sachin Tendulkar and Lata Mangeshkar