सर्वधर्म समभाव, सर्वधर्म सद्भाव; भारत जोडोत दिला नारा….
राहुल गांधी यांनी लिहिले, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समरसता असं सांगताना त्यांनी भारताच्या शांततापूर्ण आणि प्रगतीशील भविष्याचा तो पाया असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
म्हैसूरः देशात 2014 साली भारतीय जनता पार्टीचे सरकार (BJP Goverment) आल्यानंतर काँग्रेसची प्रचंड मोठी पिछेहाट होण्यास सुरुवात झाली. अनेक राज्यातून सत्ता गमवल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पुन्हा मैदानात उतरले आहेत. भारत जोडो यात्रेतही राहुल गांधींनी नवनवे प्रयोग करत ही यात्रा आता केरळ मार्गे कर्नाटकात येऊन पोहचली आहे. राहुल गांधींनी सोमवारी म्हैसूरमध्ये मंदिर, मस्जिद आणि चर्चेमध्ये (Temples, Mosques and Discussions) जात प्रार्थना केली आहे.
सर्वधर्म समभाव, सर्वधर्म सद्भाव – भारत के शांतिपूर्ण व प्रगतिशील भविष्य की नींव है। pic.twitter.com/YR1KvTTKGO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 3, 2022
एवढेच नाही तर राहुल गांधी यांनी ट्विट करून सर्वधर्म समभाव आणि सर्वधर्म समरसतेचा नारा दिला आहे.
राहुल गांधी यांनी लिहिले, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समरसता असं सांगताना त्यांनी भारताच्या शांततापूर्ण आणि प्रगतीशील भविष्याचा तो पाया असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मंदिरामध्ये जाऊन त्यांनी तिथे प्रार्थना केली आहे. राहुल गांधी मंदिरामध्ये पोहचताच मंदिरातील नागरिकांनी त्यांचे जोरदार पणे स्वागत केले.
यावेळी त्यांना प्रश्न विचारत त्यांची भेटही घेतली आहे. त्याच बरोबर राहुल गांधी यांनी म्हैसूरमधील मस्जिद-ए-आझम येथेही त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी सेंट फिलोमिना चर्चमध्येही त्यांनी प्रार्थना केली.
एकीकडे कर्नाटकात राहुल गांधींना प्रचंड मोठा जनसमुदायाचा पाठिंबा मिळत असतानाच दुसरीकडे मात्र कर्नाटकातील सर्व कन्नड संघटनांकडून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत.
या संघटनांकडून काँग्रेसला कन्नड ध्वजासह राहुल गांधींचे चित्र वापरू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. त्या बरोबरच कन्नड झेंड्यामध्ये राहुल गांधी यांचा फोटो वापरल्याबद्दल माफी मागण्यासही त्यांनी सांगितले आहे.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कर्नाटकात काँग्रेसने कन्नड झेंड्यामध्ये राहुल गांधींचा फोटो वापरल्याने कन्नड संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कर्नाटकात भारत जोडो यात्रा आल्यानंतर अनेक नेत्यांनी या यात्रेत सहभाग नोंदविला आहे. त्याच बरोबर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीही 6 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत त्या पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.
कारण ज्यावेळी भारत जोडो यात्रा सुरु झाली होती त्यावेळी सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या होत्या. त्यानंतर त्या भारतात आल्यानंतर आता त्या यात्रेत सहभागी होणार आहेत.
कर्नाटकात काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा 21 दिवस चालणार आहे. त्यामुळे राज्यातील 511 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार आहे.