‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र
काँग्रेसने थेट फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे (Congress demand high level inquiry of Facebook).
नवी दिल्ली : काँग्रेसने थेट फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनाच पत्र लिहून भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई न करण्याच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे (Congress demand high level inquiry of Facebook). दुसरीकडे काँग्रेसने भारतात संसदीय समितीकडून या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचीही मागणी केली. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी मार्क झुकरबर्ग यांना ईमेलद्वारे पत्र लिहून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच फेसबुकने आपल्या स्तरावर देखील याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
के. सी. वेणुगोप यांनी मार्क झुकरबर्ग यांच्याकडे फेसबुक इंडियाबाबत अनेक आक्षेप नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणाची फेसबुकच्या मुख्यालयाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच चौकशी होऊपर्यंत फेसबुक इंडियाची जबाबदारी आरोपी अधिकाऱ्यांकडून काढून नव्या टीमकडे देण्याचीही मागणी केली. आरोपी अधिकाऱ्यांकडून चौकशी प्रभावित होऊ नये, यासाठी अशी मागणी केल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : ‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप
पक्षपात, झूठी ख़बरों और नफ़रत-भरी बातों को हम कठिन संघर्ष से हासिल हुए लोकतंत्र के साथ खिलवाड़ नहीं करने देंगे।@WSJ ने खुलासा किया है कि फेसबुक इस तरह के झूठ और नफ़रत फैलाने का काम करती आयी है और उस पर सभी भारतीयों को सवाल उठाना चाहिए। pic.twitter.com/FecnAW90hH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 18, 2020
राहुल गांधी म्हणाले, “भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजप आणि आरएसएस यांचं नियंत्रण आहे. या माध्यमातून ते खोट्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट पसरवून मतदारांची दिशाभूल करतात. अखेर अमेरिकेतील माध्यमांनी फेसबुकचा खरा चेहरा समोर आणला आहे.”
“आम्ही पक्षपातीपणा, खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण गोष्टींना कठोर संघर्षांतून मिळवलेल्या लोकशाहीसोबत खेळू देणार नाही. फेसबुक या प्रकारच्या खोट्या आणि द्वेषपूर्ण बातम्या पसरवण्याचं काम करत असल्याचं डब्ल्यूएसजेने समोर आणलं आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी फेसबुकच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित करायला हवे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या :
Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती
फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा दंड
एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?
Congress demand high level inquiry of Facebook