काँग्रेस पोस्टर छापण्यालाही मोहताज… पोस्टर छापायला, रेल्वे तिकीटालाही पैसे नाहीत; सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी मांडली व्यथा

भाजपाने आमची खाती गोठवून त्यातून 115.32 कोटी काढून जनतेने आम्हाला दिलेले दान लुटले आहे. भाजपासहीत कोणताही राजकीय पक्ष आयकर भरत नाही. तरीही आमच्या कॉंग्रेस पार्टीची 11 बॅंक खाती गोठविली आहेत, आम्ही आमचा प्रचार देखील करू शकत नसल्याचे कॉंग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पोस्टर छापण्यालाही मोहताज... पोस्टर छापायला, रेल्वे तिकीटालाही पैसे नाहीत; सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी मांडली व्यथा
congress leader press conferenceImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 4:02 PM

नवी दिल्ली | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला असताना कॉंग्रेसने गुरुवारी पक्षाची बॅंक खाती गोठवल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. एखाद्या पक्षाचे ऐन लोकसभा निवडणूकीत खाती गोठविण्याचा प्रकार हा खतरनाक खेळ असल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. भाजपाने स्वत:साठी हजारो कोटी जमा केलेत आणि आमची खाती मात्र गोठवून टाकल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.

भारताला अख्ख्या जगात लोकशाही, मुल्ये आणि आदर्शासाठी ओळखले जाते. कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणूका होणे गरजेचे आहे. सर्वांना समान संधी मिळायला हवी परंतू आमच्या पक्षांची खाती गोठविल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचे खरगे यांनी सांगितले. आता भारताची जी प्रतिमा जगात होती. त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही समानपातळीवर निवडणूका लढवू नये यासाठी आमची खाती फ्रिज केली आहेत. एखाद्या राजकीय पक्षाला निवडणूकच लढविण्यात बाधा निर्माण करणे हा खतरनाक खेळ खेळला जात आहे. सर्वत्र सत्ताधारी पक्षाच्या जाहीरातींचा पूर आहे. यातही यांचीच मोनोपॉली असल्याची टीका खरगे यांनी केली आहे.

जनतेने साथ दिली नाही तर कोणीच राहणार नाही

खरगे यांच्या मुद्द्यालाच पकडत सोनिया गांधी यांनी हा मुद्दा केवळ कॉंग्रेससाठीच नव्हे तर संपूर्ण लोकशाहीसाठीच धोकादायक आहे. जनतेने आम्हाला दिलेला पैसा लुटला जात आहे. हे लोकशाहीला धरुन नसल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. यावेळी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने आमची खाती फ्रिज करून त्यातून जबरदस्ती 115 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स सरकारला ट्रान्सफर केला आहे. ही कुठली लोकशाही आहे. जर जनतेने आम्हाला साथ दिली नाही तर लोकशाही राहणार नाही आणि आम्ही तुम्ही राहणार नसल्याचे माकन यांनी म्हटले आहे.

जनतेचे दिलेले पैसे लुटत आहेत

आर्थिक वर्षे 2017-18 साठी एक नोटीसीसाठी चार बॅंकातील आमच्या 11 बॅंक खात्यातील 210 कोटी रुपयांच्या निधीवर अंकुश बसविला गेला. 199 कोटी रुपयांच्या एकूण निधीतील केवळ 14.49 लाख रोकड ( आमच्या खासदारांनी पक्षाला दान केलेला निधी ) सापडली होती. ही रोख रक्कम एकूण दानापैकी केवळ 0.07 टक्के आहे. आणि शिक्षा 106 टक्के रकमेला झाल्याचे माकन यांनी म्हटले आहे.

आम्ही निवडणूक लढवायची कशी

बॅंक खाती दर गोठवली तर आम्ही निवडणूक कशी लढवायची. तुमची जर खाती बंद केली, एटीएम बंद केले तर तुम्ही जगणार कसे. ना आम्ही प्रचार करू शकत. ना प्रवास करू शकत. ना नेत्यांना खर्चासाठी पैसे देऊ शकत अशी व्यथा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. निवडणूकीच्या दोन महिने आधी अशी कारवाई करणे म्हणजे ते कॉंग्रेसला निवडणूक लढवू देऊ इच्छित नाहीत. हा कॉंग्रेस सोबतचा अन्याय आहे. या निवडणूक आयोग देखील गप्प आहे. आम्हाला 20 टक्के जनता मतदान करते. परंतू सर्व संविधानिक यंत्रणा या अन्यायावर शांत बसल्याचे राहुल गांधी यांनी टीका करताना म्हटले आहे.

लोकशाहीच फ्रीज केली आहे

सात वर्षांपूर्वी 14 लाखाचे प्रकरण होते. आज 200 कोटी वसुल करीत आहेत. नियमानूसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड होतो. सीताराम केसरी यांच्या काळातील नोटीसी आता दिल्या जात आहेत. देशात लोकशाही आहे. हे सर्वात मोठे असत्य आहे. आमची खाती फ्रिज केली जात नसून लोकशाहीच फ्रिज केली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.