Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजीव गांधी जी का सपना हो रहा…’ म्हणत काँग्रेसची राम मंदिर उभारणीत उडी, मध्य प्रदेशात निधीसंकलन

काँग्रेसने राम मंदिरासाठी निधी उभारणीच्या कार्यक्रमात स्वतंत्रपणे उडी घेतली आहे. ( Congress collecting rupees ram mandir)

'राजीव गांधी जी का सपना हो रहा...'  म्हणत काँग्रेसची राम मंदिर उभारणीत उडी, मध्य प्रदेशात निधीसंकलन
प्रातिनिधक फोटो
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 3:08 PM

भोपाळ : राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजप आणि हिंदुत्वादी संघटनांनी निधी उभारणीसाठी मोहीम हाती घेतली असताना काँग्रेसनेसुद्धा निधी उभारणीच्या कार्यक्रमात स्वतंत्रपणे उडी घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स राजीव गाधींच्या फोटोसह झळकले आहेत. (Congress is collectiing rupees for building ram temple)

भारतीय जनता पार्टी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिरासाठी निधी जमवणे सुरु केले आहे. त्यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवली जातेय. त्यानंतर आता काँग्रेससुद्धा राम मंदिरासाठी स्वतंत्रपणे निधी उभारत आहे. मध्य प्रदेशमध्ये त्या आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळचे म्हटले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनी निधी उभारणी सुरु केली आहे. त्यांनी भोपाळमध्ये तशा आशयाचे पोस्टर्स लावले असून त्यामध्ये राम मंदिराची निर्मिती करणे हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न होते. त्यासाठी आपण निधी द्यावा असं लिहिलेलं आहे.

काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये राम मंदिर उभारणीसाठी अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

पोस्टरवर राजीव गांधींचा फोटो

भोपाळमधील न्यू मार्केटमधील हनुमान मंदिरासमोर काँग्रेसचे आमदार पी. सी. शर्मा यांनी राम मंदिरासाठी निधी संकलनाचे काम सुरु केले आहे. यासाठी त्यांनी राजीव गांधी यांचा 1989 मधील फोटोचा वापर केलाय. या फोटोमध्ये 1989 साली राजीव गांधी अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन करताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये राम मंदिर ट्रस्टचा बँक अकाऊंट नंबरसुद्धा दिलेला आहे. या अकऊंटमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी निधी द्यावा करावे असे आवाहन पी. सी शर्मा यांनी पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. पोस्टरवर ‘राजीव गांधी जी का सपना हो रहा साकार राम मंदिर ले रहा आकार’, ‘मंदिर निर्माण में हाथ बढ़ाएं, आओ प्रभु राम का घर सजाएं.’ असं हिंदीमध्ये लिहलेलं आहे.

दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीसुद्धा राम मंदिर निर्माणाचे स्वागत केले आहे. त्यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीसुद्धा राम मंदिर निर्माणाचे स्वागत करत राजीव गांधींची अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची इच्छा होती, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी जमा करण्याचे काम सुरु केले होते.

संबंधित बातम्या :

संजय राऊतांची भूमिका राम मंदिर विरोधी, आशिष शेलारांचा हल्लाबोल

राम मंदिर आंदोलनातील राजकीय घुसखोर कोण आहेत ते कळू द्या; शेलारांची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका

Ayodhya Dhannipur Masjid: 30 किमी अंतराने संपला 28 वर्षांचा संघर्ष, हा ‘विविधतेत एकता’ असलेला भारत

(Congress is collectiing rupees for building ram temple)

मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ.
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.