काँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…

काँग्रेस 2014 ची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मात्र मल्लिकार्जून खर्गे यांचा राजकीय उदय झाला आहे. त्यावेळेपासून काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयामध्ये खर्गे महत्वाचा भाग बनले आहेत.

काँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ; हेच पुन्हा एकदा सिद्ध...
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 4:36 PM

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Election 2022) जाहीर होताच देशातील पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला. अशोक गेहलोत, शशी थरुर, दिग्विजय सिंह यांच्या नावाची चर्चा सुरु असतानाच मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली. कारण खर्गे म्हणजे काँग्रेसमधीन निष्ठेचं दुसरं नाव समजलं जातं. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या जयपूरमध्ये झालेल्या गदारोळानंतर गांधी कुटुंबीयांनी आपली अध्यक्ष पदाची शोध मोहीम निष्ठावंत खर्गे यांच्यावर आणून थांबवल्याचे बोलले जात आहे.

अशोक गेहलोत यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे 10 जनपथवर खरं तर सुनसान शांतता पसरली होती. त्यामुळेच दिग्विजय सिंह यांना घाईघाईने दिल्लीला बोलावून पवन बन्सल यांचा उमेदवारी अर्ज त्यांना घ्यावा लागला होता.

मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाची नावाची जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर मल्लिकार्जु खर्गे यांच्या नावाची पक्षावर छाप काय पडेल आणि प्रतिमा कशी उजळणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावामुळे काँग्रेसला का फायदा होईल याची अटकळ बांधली जाऊ लागली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे हे उत्तर कर्नाटकातील बिदर येथील असून ते 9 वेळा आमदार आणि दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत.

ते जातीने दलित असले तरी दलित राजकारणासाठी ते ओळखले जात नाहीत. 2014 ते 2019 पर्यंत ते लोकसभेत काँग्रेसचे नेते म्हणून राहिले आहेत आणि आता राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

1942 मध्ये जन्मलेले, 80 वर्षीय खर्गे हे गांधी कुटुंबीयांच्या जवळचे आहेत.मात्र याआधी ते कर्नाटकातील सर्वोच्च नेतृत्वाचा कधीच भाग बनले नव्हते.

काँग्रेस 2014 ची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मात्र मल्लिकार्जून खर्गे यांचा राजकीय उदय झाला आहे. त्यावेळेपासून काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयामध्ये खर्गे महत्वाचा भाग बनले आहेत.

त्यामुळे आता काँग्रेसला खर्गे अध्यक्ष झालेच तर तेच राहुल गांधी यांच्याबरोबर अगदी निष्ठेने काम करतील असंही मत व्यक्त केलं जात आहे.

निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून खर्गे यांची ओळख असल्यामुळेच दिग्विजय सिंह, भूपेंद्र हुड्डा आणि अशोक गेहलोत यांनी त्यांच्याच नावाला पहिली पसंदी दिली आहे.

खर्गे यांचा उत्तर भारतात तसा राजकीय आणि सार्वजनिक संपर्क नसला तरी त्यांना दैनंदिन कामार त्याचा काय परिणाम होणार नाही असंही सांगितलं जात आहे.

आता निवडणूक झाली तर त्यांची लढत मात्र होणार आहे ती शशी थरूर यांच्याशीच. मात्र शशी थरुरांना पक्षातून म्हणावा तसा पाठिंबाही मिळणार नाही असं राजकीय विश्लेषक मानताता.

दुसरी बाब म्हणजे खासदार मनीष तिवारी यांनी काँग्रेसच्या इलेक्टोरल कॉलेजवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार यादीतूनच निवड झाली, तर सभापती कसा निवडला जाणार, असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे ही निवडणूक आश्चर्यकारक नाही. यामध्ये एकच आश्चर्य म्हणजे G-23 चे सर्व नेते खर्गे यांच्यासोबत दिसणार आहेत.

त्यामध्ये मनीष तिवारी, अंबिका सोनी, दीपेंद्र हुडा यांच्यासह अनेक नेतेही आहेत. या युद्धात झारखंडचे नेते के.एन. त्रिपाठी यांनी उडी घेतली असली तरी त्यांची राज्याबाहेर कोणतीच मजल नाही.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.