राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीची ‘नोटीस पे नोटीस’, काँग्रेस उद्या देशभर पत्रकार परिषद घेणार

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून'नोटीस पे नोटीस' धाडण्यात येत आहेत. अश्यात आता काँग्रेस देशभर पत्रकार परिषद घेणार आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीची 'नोटीस पे नोटीस', काँग्रेस उद्या देशभर पत्रकार परिषद घेणार
सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 6:40 PM

मुंबई : काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीकडून (ED Notice) ‘नोटीस पे नोटीस’ धाडण्यात येत आहेत. अश्यात आता काँग्रेस (Congress) देशभर पत्रकार परिषद घेणार आहे. नॅशनल हेराल्ड केस (National Herald Case)या दोघांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली आहे. 13 जून रोजी राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळी काँग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यासाठी काँग्रेसनं आपल्या नेत्यांना दिल्लीला बोलावलं आहे. शिवाय उद्या काँग्रेस देशभर पत्रकार परिषद घेणार आहे.

उद्या देशभर पत्रकार परिषद

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून’नोटीस पे नोटीस’ धाडण्यात येत आहेत. अश्यात आता काँग्रेस देशभर पत्रकार परिषद घेणार आहे.

हे सुद्धा वाचा

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. 2012मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. 2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटीचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा असे काही नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटीचं कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.