मुंबई : काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीकडून (ED Notice) ‘नोटीस पे नोटीस’ धाडण्यात येत आहेत. अश्यात आता काँग्रेस (Congress) देशभर पत्रकार परिषद घेणार आहे. नॅशनल हेराल्ड केस (National Herald Case)या दोघांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली आहे. 13 जून रोजी राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळी काँग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यासाठी काँग्रेसनं आपल्या नेत्यांना दिल्लीला बोलावलं आहे. शिवाय उद्या काँग्रेस देशभर पत्रकार परिषद घेणार आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून’नोटीस पे नोटीस’ धाडण्यात येत आहेत. अश्यात आता काँग्रेस देशभर पत्रकार परिषद घेणार आहे.
Congress will hold press conferences across the country tomorrow, 12th June, on the issue of summoning of Sonia Gandhi and Rahul Gandhi by ED in the National Herald case.
(File photos) pic.twitter.com/tAv6z4Qa8o
— ANI (@ANI) June 11, 2022
नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. 2012मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. 2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटीचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा असे काही नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटीचं कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं.