राहुल गांधी आपल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले, सोनिया गांधी यांनीही स्पष्टच सांगितलं
अलिकडेच जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या लग्नाचा विषय छेडत सोनिया गांधी यांना पोराचं लग्न उरकून टाका असं म्हटलं होतं. आता त्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्याच मंचावर राहुल यांच्या लग्नाचा विषय सार्वजनिक झाला आहे.
मुंबई | 29 जुलै 2023 : देशात बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान कधी लग्न करणार ? असा सवाल नेहमीच चर्चेत येतो. तसेच राजकारणात कॉंग्रेस नेते राहुल गांधी कधी लग्न करतायत असं नेहमीच विचारलं जातं, मात्र अनेकांना तर असं वाटतं त्याचं लग्न आधीच झालं आहे की काय ? परंतू तरीही पुन्हा.. पुन्हा राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय ऐरणीवर येतोच. आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीचं राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत प्रथमच वक्तव्य केलं आहे. त्यावर राहुल यांनी गुलाबी होत उत्तर दिलं आहे. काय झाला नेमका संवाद तो पाहा..
कॉंग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या निर्भीड आणि बिनधास्त स्वभावाबद्दल ओळखले जातात. त्यांची भारत जोडो यात्रा आणि देशभरातील नागरिकांशी संवाद साधणं अनेकांना आवडलं. आता अलिकडेच जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या लग्नाचा विषय छेडत सोनिया गांधी यांना पोराचं लग्न उरकून टाका असं म्हटलं होतं. आता त्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्याच मंचावर राहुल यांच्या लग्नाचा विषय सार्वजनिक झाला आहे.
हरियाणाच्या शेतकरी महिलांना राहुल गांधी यांनी दिल्लीत बोलावून त्यांच्या सोबत जेवण घेतलं. त्यावेळी शेतकरी महिलांशी अत्यंत आस्थेवाईकपणे प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनमोकळ्या गप्पा रंगल्या. यावेळी एका महिलेने सोनिया गांधी यांनी सासू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या दहशतवादी हल्ल्यातील अस्कमात मृत्यूनंतर तुम्ही कशा काय निडरपणे या सर्वांना सोमोरे गेल्या असे विचारत, त्यांना त्याग की मूरत है वो आप, आपको सॅल्यूट मॅम असे म्हटले.
आई कश्मीरी जेवण शिकली
सोनियाजी तुम्हाला लहानपणी काय बनवून द्यायच्या असा सवाल एका महिलेने प्रियंका यांना विचारला असता त्या म्हणाल्या की आई आता जेवण बनवित नाहीत, परंतू लहानपणी आईच जेवण बनवत असायची, कश्मीरी ब्राह्मणात लसून खात नाही, दही गरम करुन लाल करतात, त्याला ‘कसून’ म्हणतात. त्यातच सारा मसाला टाकतात. ही सर्व पद्धत आई शिकल्याचे प्रियंका म्हणाली.
भारत जोडो यात्रा आव्हानच होती
राहुल गांधी यांना त्यांच्या भारत यात्रेबद्दल एका महिलेने विचारले तर ते म्हणाले खूप आव्हानात्मक होते. रोजचे सहा सात तास चालणे खायचे काम नव्हते. माझ्या गडघ्यातही दुखणे सुरु झाले होते पण मी मॅनेज केले पहिल्यांदा सुरु केले तेव्हा वाटले कसे चालणार चार हजार किमीचा प्रवास आहे. परंतू नंतर सर्व केले. करताना अनेक वेगळे अनुभव आले, अनेक व्यक्तींशी बोलायला मिळाले नवीन गोष्ट ही शिकायला मिळाली की कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनाला तयार करावे लागते. एकदा तुमच्या मनाने निर्धार केला की कोणतीही गोष्ट अवघड नाही.
महिलांनी शांत बसू नये
तुमच्या घरात अनेक स्ट्रॉंग धाडसी महिला आहेत तुम्हाला काय वाटते असे एका महिलेने विचारता राहुल म्हणाले की महिलांमध्ये कोणतीही कमरता नाही. महिलांनी शांत बसू नये आपली भूमिका न घाबरता मांडायला हवी. आणि महिलांनी स्वावलंबी व्हायला हवे कोणतेही काम निडरपणे काम करायला हवे असेही राहुल यांनी सांगितले.
लग्न करुया की !
एका महिलेने तर थेट सोनिया गांधी यांच्या कानात राहुल गांधीचं लग्न लावून द्या ना…? तर सोनिया गांधी पटकन या महिलेला म्हणाल्या की आता तुम्हीच मुलगी शोधा ना ? यावर एकच हशा पिकला. तर राहुल गांधींना विचारले असता ते जरा लाजतच म्हणाले लग्न करुया की ? असं म्हणत ते हसले.