‘भारतावर 185 करोडोंचं कर्ज, सर्वाधिक बेरोजगारी असलेला देश’; सचिन पायलट यांचा केंद्र सरकारवर हल्ला

भाजपला जर माहिती आहे आपण सत्तेत येऊ तर इतर पक्षांच्या लोकांची त्यांना गरज काय आहे. त्यांना माहिती आहे महागाई बेरोजगारी यामुळे देशात असंतोष असल्याचं म्हणत काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

'भारतावर 185 करोडोंचं कर्ज, सर्वाधिक बेरोजगारी असलेला देश'; सचिन पायलट यांचा केंद्र सरकारवर हल्ला
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 8:34 PM

मुंबई | पुन्हा निवडणुका येत आहेत. आम्ही मागच्या 10 वर्षांचे आकलन केलंय. भाजप सत्तेत येताना म्हणाला आम्ही बदल करू म्हणालं होतं मात्र तस झालं नाही. स्वतंत्र भारतात आज सर्वात जास्त बेरोजगारीचा आकडा आहे. 42 टक्के शिक्षित बेरोजगार आहेत. महागाई वाढल्याचं म्हणत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

भाजपला आमच्या माणसांची गरज का पडते?

लोकं सोडून जातात तेव्हा चांगल वाटत नाही. भाजपला जर एवढा विश्वास आहे की 10 वर्षाच्या कार्यकाळवर निवडून येऊ तर यांची गरज का?  जे गेलेत त्यांना वेळ आली की समजेल त्यांचा निर्णय चुकीचा होता की बरोबर. ज्यांना लोकशाहीत संघर्ष करायची इच्छा आहे ते संघर्ष करतील. चीन घुसखोरी करतोय त्यावर कोणी उत्तर देत नाहीये. पक्ष येत जात राहतील मात्र देश राहिला पाहिजे. सत्तेत जे लोक आहेत त्यांच्यामुळे चीन सोबत संघर्ष करू शकत नाहीये. सरकार ने 2014 ला वाचन दिले किमान ते तर पूर्ण करावे, असं पायलट म्हणाले.

सर्वांना माहिती आहे दबाव आहे. काँग्रेसने एक विचारधारा पुरविली. काँग्रेसने सर्व देशाला एक ठेवले. जनतेला कळलय काय आता ती निर्णय घेईल. चंदिगढ मध्ये महापौर ची निवडणूक होती. निवडणूक आयोग च्या बाबतीत असे होत असेल तर लोकशाही मजबूत कशी होतेय? आम्ही सर्व सुप्रीम कोर्टला मानतो, कारण त्यांची आस्था आहे, जर ती नाही मानली ते हे चांगलं नसल्याचं पायलट यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना परत आंदोलन करावं लागतंय- पायलट

शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारच्या नियतीत खोट, मागे पण आंदोलन झाले आणि तेव्हा सरकारने चूक मान्य करत काळे कायदे मागे घेतले. तेव्हा शेतकऱ्यांना MSP चे आश्वासन दिले होते. आज 3 वर्षांनंतर शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलन करावं लागतंय. काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यांनी छत्तीसगढ च्या अंबिका गावमध्ये घोषणा केली होती की जर आमचे सरकार आले तर MSP कायदा आणणार. सरकारला शेतकऱ्यांचे हित नको त्यांना फक्त व्होट पाहिजे, भारतावर 2014ला 55लाख करोडचे कर्ज होत आणि आता 185 लाख करोड कर्ज आहे. गरीब गरीब होत चाललेत, आणि अमीर आणखी अमीर होत चाललेत. क्रूड ची किंमत कमी झालीत मात्र पेट्रोल महागच होत आह. कृषीच्या नावावर कंपन्यांनी 40हजार करोड कमावलेत. असा प्रचार होतोय की आम्ही इतके ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झाली मात्र सामान्य माणसांचे कोणीही ऐकायला तयार नसल्याचं सचिन पायलट म्हणाले.

विरोधकांना निलंबित करून बिल पास करून घ्यायचं- पायलट

सुप्रीम कोर्टाच्या क्रेडीबिलिटीला आपण आव्हान दिले तर संकट येईल. 95 टक्के विरोधकांवर ईडीच्या कारवाई होत आहेत. दोन डझन पक्ष आम्ही निवडणूक लढणार आहोत. देशात विरोधक हे गरजेचे आहेत, मात्र कोणीतरी म्हणते काँग्रेस मुक्त भारत, विरोधकांना निलंबित करायचे आणि बिल पास करून घ्यायचे. यांची ही वागणूक आहे ती लोकशाहीमध्ये योग्य नसल्याचं पायलट यांनी म्हटलं आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.