हिंदू शब्द का अर्थ बहुत गंदा है, काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, भाजपचा हल्लाबोल…
हिंदू हा शब्द भारताचा नाही, तर आमच्यावर जबरदस्ती केली जात असून या शब्दाचा अर्थ अतिशय घाणेरडा असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेळगावः कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू या शब्दाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणाले की, हिंदू शब्द का अर्थ बहुत गंदा है. हे सांगत असताना त्यांनी हिंदू हा शब्द फारसी भाषेतून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. जारकीहोळी हे रविवारी बेळगावी जिल्ह्यातील निप्पाणी परिसरातील मानव बंधुता संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, हिंदू हा शब्द भारताचा नाही, तर आमच्यावर जबरदस्ती केली जात असून या शब्दाचा अर्थ अतिशय घाणेरडा असल्याचेही त्यांनी सांगितले. या त्यांच्या विधानावरून भाजपने हल्लाबोल चढविला आहे.
जारकीहोळी म्हणाले, हिंदू हा शब्द कसा आला यावरुन वादविवाद झाले पाहिजे. हिंदू हा शब्द फारसी भाषेतून आला आहे.
इराक, इराण, कझाकस्तान, याचा भारताशी काय संबंध? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थ माहित असेल तर तुम्हाला त्याची लाज वाटेल असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
हिंदू या शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा असून ते म्हणाले, काही लोक या परकीय शब्दावरुन वाद उफाळून काढत आहेत. त्यामुळे हा परकीय शब्द का लादला जातोय यावरही चर्चा झाली पाहिजे असंही त्यांनी मत मांडले आहे.
जारकीहोळी यांच्या या भाषणाशी संबंधित एक व्हिडिओ क्लिपही समोर आली असून ती सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे.
यादरम्यान जारकीहोळी यांनी निप्पाणी मतदारसंघात जारकीहोळी कुटुंबीय निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनीही गीतेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. जिहाद केवळ कुराणात नाही, तर गीतेतही जिहाद सांगितले असल्याचे मत त्यांनी मांडले होते.
सतीश जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने आता काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला हे म्हणाले की, शिवराज पाटील यांच्यानंतर आता कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनीही हिंदूंना चिथावणी दिली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे. हा योगायोग नसून तो व्होटबँकेसाठी चाललेल उद्योग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.