Lockdown | नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर-चिदंबरम यांचा पाठिंबा
लॉकडाऊन वाढवण्याची सक्ती आम्ही समजू शकतो. आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो' असं ट्वीट माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केलं आहे. (Congress Leader Shashi Tharoor P Chidambaram supports Lockdown)
नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवला आहे. नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर आणि पी चिदंबरम यांनी ट्विटरवरुन पाठिंबा दर्शवला आहे. (Congress Leader Shashi Tharoor P Chidambaram supports Lockdown)
‘लॉकडाऊन विस्ताराच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचे मी समर्थन करतो. मात्र जे आपली दैनंदिन निकड भागवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मोदींनी दिलासादायक निर्णय जाहीर करायला पाहिजे होते. मनरेगाची देयके, जनधन खाती, राज्यांना जीएसटी थकबाकी आणि मदत दिली असती, तर सोन्याहून पिवळं झालं असतं’ असं ट्वीट कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी केलं आहे.
I support the announcement by @PMOIndia @narendraModi of #Lockdown extension. Can’t discard the gains being made. But he should have also announced serious relief for those who cannot make ends meet. MNREGA payments, JanDhan accounts, GST dues to states,&aid to sweeten the pill.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 14, 2020
‘आम्हीही पंतप्रधानांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. लॉकडाऊन वाढवण्याची सक्ती आम्ही समजू शकतो. आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो’ असं ट्वीट माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केलं आहे.
We reciprocate the PM’s New Year greetings. We understand the compulsion for extending the lockdown. We support the decision
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 14, 2020
‘गरीबांना 21 + 19 दिवस स्वत:ची काळजी स्वतःच घेण्यासाठी वाऱ्यावर सोडले आहे. पैसा आहे, अन्न आहे, परंतु सरकार पैसे किंवा अन्न देत नाही.’ असं म्हणत चिदंबरम यांनी टीकाही केली आहे.
The poor have been left to fend for themselves for 21+19 days, including practically soliciting food. There is money, there is food, but the government will not release either money or food.
Cry, my beloved country.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 14, 2020
‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवला आहे. म्हणजेच 3 मेपर्यंत ‘लॉकडाऊन 2’ चा कालावधी असेल. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. देशाला संबोधित करताना त्यांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. (Congress Leader Shashi Tharoor P Chidambaram supports Lockdown)