Prashant Kishore Congress : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार? सोनिया गांधी यांनी बोलवली महत्वपूर्ण बैठक
प्रशांत किशोर हे काँग्रेस जॉईन करणार असल्याचाही चर्चा सुरू आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांना येत्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्यापासासून प्रशांत किशोर हे नाव देशभर गाजत आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दिल्लीत एक मोठी बैठक बोलवली आहे. या बैठकीला निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यापासून ते मल्लिकार्जून खरगे यांच्यापर्यंत बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे संपर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. अंबिका सोनी, दिग्विजय सिंह, आजय माकन यांचीही या बैठकीला उपस्थिती असणार आहे. प्रशांत किशोर हे काँग्रेस जॉईन करणार असल्याचाही चर्चा सुरू आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांना येत्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्यापासासून प्रशांत किशोर हे नाव देशभर गाजत आहे. ममता बॅनर्जी यांच्या बंगलामधील विजयात प्रशांत किशोर यांचाही मोठा वाटा मनला जातो.
सोनिया गांधी यांनी बोलवली बैठक
सोनिया गांधी या 10 जनपथ या ठिकाणी ही बैठक बोलवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये दाखल होण्याच्या आणि त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आता त्या चर्चा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली आहे. तसेच पाच राज्यात झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या पारड्यात काहीही आलेलं नाही. त्यामुळे पराभावच्या या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस सध्या धडपडत आहे. त्यामुलेच काँग्रेसकडून विविध प्रयत्न सुरू आहेत.
अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर यांचं नाव चर्चेत
प्रशांत किशोर आणि त्यांची कंपनी दोन्हींची जादू पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दिसून आली होती. त्यामुळे आता काँग्रेसमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजबमध्ये गेल्या वेळी काँग्रेसचेचे सरकार असूनही काँग्रेसला पुन्हा मोठी हार पत्करावी लागली आहे. ते डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काँग्रेस काही ठोस पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार का आणि जर काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना कोणती जबाबदारी मिळणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.