‘जिहाद’ फक्त कुराणात नाही तर गीतेतही; ‘या’ नेत्यांनी केलं वादग्रस्त विधान…

जिहाद हा केवळ कुराणात नाही तर तो गीतेतही सांगितला असल्याचा शिवराज पाटील सांगितले.

'जिहाद' फक्त कुराणात नाही तर गीतेतही; 'या' नेत्यांनी केलं वादग्रस्त विधान...
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 10:23 PM

नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील (Former Home Minister Shivraj Patil) यांनी नुकताच एक वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, जिहाद (Jihad) केवळ कुराणात नाही तर गीतेतही (Geeta) सांगितला आहे. त्यापुढे जाऊन ते म्हणाले की, महाभारतातही श्रीकृष्णानी अर्जुनाला जिहादचा धडा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शिवराज पाटील म्हणाले की, जिहाद हा केवळ कुराणात नाही तर तो गीतेतही सांगितला आहे.

कितीही प्रयत्न करूनही जर कोणाला स्वच्छ विचार कळत नसतील तर सत्तेचा वापर केला पाहिजे असं असल्याचंही त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते म्हणाले, गीतेचा जो काही विशिष्ट भाग महाभारतात सांगण्यात आला आहे, त्यामध्येच जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णांनी अर्जुनालाही जिहादचा धडा शिकवला होता असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवराज पाटील यांची गणना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते. ते महाराष्ट्रातील असून शिवराज पाटील हे लातूरचे खासदार आहेत.

मात्र गेल्या 2014 पासून ही जागा भाजपच्या ताब्यात गेल्याने त्या याठिकाणी आता भाजपकडून बऱ्याच निवडणुका जिंकण्यात आल्या आहेत.

शिवराज पाटील 1980 पासून अनेकदा केंद्रात मंत्री राहिले आहेत. 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते देशाचे गृहमंत्री होते.

2010 मध्ये, शिवराज पाटील यांची पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.