Ahmed Patel | काँग्रेसच्या चाणक्याने कष्टाने जिंकलेली राज्यसभेची जागा भाजपकडे जाण्याची चिन्हं

भाजपला कडवी झुंज देत अहमद पटेल यांनी 2017 मध्ये राज्यसभेची जागा काँग्रेसकडे खेचून आणली होती

Ahmed Patel | काँग्रेसच्या चाणक्याने कष्टाने जिंकलेली राज्यसभेची जागा भाजपकडे जाण्याची चिन्हं
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 4:03 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे चाणक्य अशी ख्याती असलेले दिवंगत नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांनी कष्टाने जिंकलेली गुजरातमधील राज्यसभेची जागा पक्षाच्या हातून निसटण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या रिक्त जागा जिंकण्यासाठी वापरलेला फॉर्म्युला पुन्हा अवलंबल्यास अहमद पटेल यांची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. (Congress likely to lose Ahmed Patel Hard-Won Rajya Sabha Seat to BJP)

भाजपला कडवी झुंज देत अहमद पटेल यांनी 2017 मध्ये राज्यसभेची जागा काँग्रेसकडे खेचून आणली होती. पाच वेळा खासदार राहिलेल्या अहमद पटेल यांचे गेल्या महिन्यात वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीवर उपचार सुरु असतानाच पटेल यांची प्राणज्योत 25 नोव्हेंबरला मालवली. अहमद पटेलांच्या निधनानंतर ही जागा रिक्त घोषित करण्यात आली होती. अहमद पटेल यांची टर्म 18 ऑगस्ट 2023 रोजी संपणार होती.

रिक्त जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणुका

दुसरीकडे, भाजप खासदार अभय भारद्वाज यांचे एक डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या खासदारकीची मुदत 21 जून 2026 रोजी संपणार होती. राज्यसभेवरील दोन्ही रिक्त जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यता वाढली आहे.

गुजरातचे पक्षीय बलाबल कसे?

गुजरातमध्ये भाजपचे 111 आमदार आहेत, तर काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ 65 इतकं आहे. राज्यसभा निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी किमान 50 टक्के किंवा 88 मतांची आवश्यकता असते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या रिक्त जागा भाजपने गेल्या वर्षी अशाच पद्धतीने जिंकल्या.

खासदार निवडण्याची पद्धत कशी होती?

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यापैकी एक जागा जिंकली होती. मात्र त्यांच्या खासदारकीला काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. एकाच हस्तांतरणीय मताद्वारे प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाची व्यवस्था (system of proportional representation by means of a single transferable vote) वापरली असती, तर दोनपैकी एक जागा आम्ही जिंकलो असतो, असा दावा काँग्रेसने केला आहे. या पद्धतीत मतदार (आमदार) प्रत्येक उमेदवारासाठी प्राधान्यक्रम ठरवतात. अधिक मतदारांनी पहिलं प्राधान्य दिलेल्या उमेदवाराची खासदारपदी निवड होते. या पद्धतीत प्रत्येक मत एकदाच मोजले जाते. (Congress likely to lose Ahmed Patel Hard-Won Rajya Sabha Seat to BJP)

राज्यसभेच्या पोटनिवडणुकांसाठी स्वतंत्र अधिसूचना जारी करण्याची पद्धत निवडणूक आयोगाने 2009 पासून लागू केली आहे, असा दावा गुजरात सरकारने केला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी अंतिम निकाल अद्याप दिलेला नाही. काँग्रेस निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन कोर्टाच्या अनिर्णित निकालाकडे लक्ष वेधणार आहे.

सलग चार वेळा राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या अहमद पटेल यांची पाचव्यांदा जागा जिंकताना चांगलीच दमछाक झाली होती. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या माजी सहकाऱ्यानेच अहमद पटेल यांच्या नाकी नऊ आणले होते.

संबंधित बातम्या :

अहमद पटेलांच्या निधनाने कोषाध्यक्षपद रिक्त, ‘चाणक्या’ची पोकळी भरण्यासाठी काँग्रेसमध्ये तिघे शर्यतीत

‘अहमद पटेल यांच्या शोकसभेला जाण्याचे संकट आलं, कशा पद्धतीने बोलावं’, शरद पवार भावूक

काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचे, त्यामागे अहमदभाई आहेत : उद्धव ठाकरे

(Congress likely to lose Ahmed Patel Hard-Won Rajya Sabha Seat to BJP)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.