पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं की, बालक बुद्धीला आता कोण सांगेल की त्याने १०० पैकी १०० नाही तर ५०० पैकी १०० आणले आहे. तो फेल झाला आहे. काँग्रेसने शोले सिनेमाला देखील मागे टाकले आहे. तिसऱ्यांदा नापास होण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. १३ राज्यांमध्ये एकही जागा आलेली नाही. इमानदारीत जनादेशचा स्वीकार करा. काँग्रेस पक्ष २०२४ पासून परजीवी काँग्रेस म्हणून ओळखली जाईल. परजीवी तो असतो जो शरीरावर असतो पण तो त्यालाच खातो. काँग्रेस ज्या पक्षासोबत युती करतो त्यांचेच मत खाऊन जातो. त्यामुळे ती परजीवी काँग्रेस झाली आहे. काँग्रेसच्या लोकांनी याचं विश्लेषण केले की नाही माहित नाही.
‘ज्या जागांवर भाजप आणि काँग्रेस असा सरळ सामना होता तेथे काँग्रेसचा स्टाईक रेट फक्त २६ टक्के होता. जेथे ते ज्युनिअर पार्टी होते अशा राज्यात काँग्रेसचा स्ट्राईक रेट ५० टक्के आहे. काँग्रेसच्या अधिक जागा या इतर पक्षांमुळे आल्या आहेत. जिथे एकटी लढली तिथे त्यांचा वोट शेअर खाली आला आहे. गुजरात, मध्यप्रदेशमध्ये फक्त २ जागा मिळाल्या.’
‘देशाने विकासाच्या मार्ग निवडला आहे. विकसित भारत करण्याचं मन बनवलं आहे. काँग्रेस अराजकता पसरवत आहेत. ते दक्षिणेत जाऊन उत्तरेच्या लोकांविरोधात बोलतात. महापुरुषांच्या विरुद्ध बोलतात. भाषेच्या आधारावर लोकांना वाटतात. ज्या लोकांनी देशाला वाटण्याच्या घोषणा दिल्या त्यांना काँग्रेसने तिकीट दिले. नव्या नव्या अफवा काँग्रेस पसरवत आहे. काँग्रेस देशात आर्थिक अराजकता पसरवत आहे. निवडणुकी दरम्यान ज्या गोष्टी केल्या गेल्या. त्यांच्या राज्यात आर्थिक पाऊल उचलत आहेत तो रस्ता आर्थिक अराजकतेकडे जात आहे.’
‘एक मुलगा शाळेतून आला आणि रडू लागला. आई देखील घाबरली का रडत आहे. तो म्हणाला शाळेत मला याने मारलं. आईने विचारलं काय झालं होतं. पण तो सांगत नव्हता. मुलाने हे सांगितले नाही की शाळेत त्या मुलाने कोणत्या तरी मुलाला आईवरुन शिवी दिली होती. त्याची पुस्तके फाडली. त्याने हे सांगितले नाही की, शिक्षिकेला चोर म्हटलं. टिफिन चोरला हे नाही सांगितलं. बालक बुद्धीचा विलाप सुरु होता. मला याने मारलं, त्याने मारलं हे सुरु होतं. सिम्पती मिळवण्यासाठी हा नवा ड्रामा सुरु झालाय. पण देशाला सत्य माहित आहे की, हे हजारो कोटींच्या हेराफेरीच्या आरोपात जामिनावर बाहेर आहेत.’
‘ओबीसीला चोर म्हणाल्याने शिक्षा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयावर बोलल्याबद्दल माफी मागावी लागली आहे. वीर सावरकरांचा अपमान केल्याचा देखील यांच्यावर गुन्हा आहे. देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला हत्यारा म्हटल्याने खटला सुरु आहे. ना बोलण्याची अक्कल आहे ना वागण्याची कोणती वर्तवणूक आहे. बालकबुद्धी सदनात देखील कोणाच्या गळ्यात पडतात. सदनात डोळे मारतात. यांचं सत्य संपूर्ण देशाला माहित आहे.’