काँग्रेसचे ‘त्या’ निर्णयावरुन ‘आप’ला समर्थन नाही; हायकमांडने नेत्यांना थेट सूचना दिल्या…
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी पक्षाच्या हायकमांडसमोर आपले मत मांडले आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्यावर सोडला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी दिल्ली आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सेवा अध्यादेशाच्या विषयावर आम आदमी पक्षाला पाठिंबा न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, खर्गे यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटी आणि पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेत्यांसोबत स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने आम आदमी पार्टीला भाजपची बी-टीम म्हटले आहे.
केवळ दिल्ली आणि पंजाबमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही आम आदमी पक्षाकडून काँग्रेसचे मोठे नुकसान केले आहे. ही बैठक केजरीवाल यांनी केंद्राने आणलेल्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मागितल्याबद्दल होती.
तसेच या मुद्द्यावर केजरीवाल यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांच्याकडे पाठिंबा मागितला होता.ज्यानी दिल्ली सरकारला नोकरदारांची बदली करण्याचा अधिकार देणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे.
तर या बैठकीनंतर पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनीही सांगितले की, जिथे वैचारिक मतभेद असतील तिथे युती होऊ शकत नाही असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेस नेतृत्व आपली भूमिका ठरवण्यापूर्वी इतर राज्यातील पक्ष नेत्यांचीही भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तर दुसरीकडे, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी पक्षाच्या हायकमांडसमोर आपले मत मांडले आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्यावर सोडला आहे.
केंद्र सरकारच्या या अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते अजय माकन सुरुवातीपासून केजरीवाल यांच्या विरोधात आहेत. तसेच त्यांनी पूर्वीपासूनच तुम्ही पक्षाला पाठिंबा देऊ नका, असंही त्यांनी हायकमांडलाही याबाबतच्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या.