मुंबई : कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचा (Congress MLA) एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. जमीर अहमद खान असं या आमदाराचं नाव आहे. जमीन खान (Jamir Khan) यांनी भेदाभेद संपवण्यासाठी आणि समाजात सुरु असलेला धर्मवाद, जातीवादाविरोधात आवाज उठवण्यासाठी चक्क एका दलित स्वामीच्या तोंडातील घास खाल्ला! त्यांनी आपल्या या कृतीतून जातीभेद (Caste Discrimination), धर्मभेद मानत नसल्याचा संदेश समाजाला दिला. तसंच त्यांनी कट्टरतावाद्यांना चांगलंच उत्तर दिल्याचं काँग्रेस नेत्याचं मत आहे. जमीर खान हे चामरपेटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर जयंती आणि ईद मिलनच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
#WATCH Bengaluru, Karnataka: In an attempt to set an example seemingly against caste discrimination, Congress Chamarajapete MLA BZ Zameer A Khan feeds Dalit community’s Swami Narayana & then eats the same chewed food by making Narayana take it out from his mouth to feed him(22.5) pic.twitter.com/7XG0ZuyCRS
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 22, 2022
आमदार जमीर खान यांनी या कार्यक्रमात जातीवादाचा प्रसार करणाऱ्यांना, समाजात द्वेषाची भावना निर्माण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. माणसा माणसात कोणताही भेद नसल्याचं सांगत त्यांनी समोरच्या ताटातून स्वामी नारायण यांना घास भरवला आणि स्वामींनाही आपल्याला घास भरवण्यास सांगितलं. स्वामींनी ताटातील घास उचलण्यासाठी हात पुढे केला. मात्र जमीर खान यांनी त्यांना रोखलं आणि स्वत:च्या तोंडातील घास काढून भरवण्यास सांगितलं. मग स्वामींनीही आपल्या तोंडातून घास काढून जमीर यांना भरवला. त्यावेळ उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.