शशी थरुंरांबरोबर केलेल्या तुलनेचं खर्गेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर; त्यांनी थेट आपली हिम्मतच दाखवली…
काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यामध्ये होत आहे. तरीही माझी आणि थरुरांची तुलना कुणीच करु नका असं खर्गेनी स्पष्टच सांगितले.
नवी दिल्लीः देशातील सगळ्यात जुन्या पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. त्या काँग्रेस पक्षाची 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच पक्षाध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election 2022) होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे पक्षाध्यक्षपदाचे आता प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे ते आता देशातील वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मतांसाठी आवाहन करत असतानाच त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की, आपली तुलना त्यांनी शशी थरुंरांबरोबर (Shashi Tharoor) करु नये.
शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोन ज्येष्ठ नेते या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे सध्या देशातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
त्यामुळे त्यांची तुलना शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये होत आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्टच सांगून टाकले की, आपली तुलना थरूर यांच्याबरोबर करुच नका.
यावेळी त्यांनी हे ही स्पष्टपणे सांगितले की, थरूर त्यांच्या जाहीरनाम्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र आहेत, मात्र त्यांचा अजेंडा हा उदयपूरच्या जाहीरनाम्यात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा होता असंही त्यांनी सांगितलं.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शशी थरूर यांच्याबरोबर माझी तुलना अजिबात करु नका. मात्र शशी थरुर यांच्या जाहीरनाम्याबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले की, मी स्वत: ब्लॉक अध्यक्षापासून माझ्या राजकारणाला सुरुवात केली आहे.
त्यावेळी शशी थरूर कुठे होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर माझी कुणी तुलनाच करु नये. या निवडणुकीत त्यांच्या जाहीरनाम्याचा पाठपुरावा करण्यासाठीही ते स्वतंत्र असल्याचेही त्यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या वाईट काळाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला घेणार असल्याचेही सांगितले.
शशी थरूर यांनीही 7 ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा त्यांचा 10 कलमी जाहीरनामा जाहीर केला.
त्या जाहीरनाम्याविषयी बोलताना सांगितले की, पक्षाचे पुनरुज्जीवन करणे, आणि पुन्हा काँग्रेसला नवी दिशा देण, प्रत्येक भागात काँग्रेस सक्रिय करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण्याचे धोरण राबवणार असल्याचे थरुर यांनी सांगितले.
तसेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपबरोबर संघर्ष कसा करायचा यासाठीही योग्य ते निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.