चर्चा काँग्रेस अध्यक्षपदाची; पण खर्गेंनी सगळ्यांची कुंडलीच मांडली…

मल्लिकार्जुन खर्गेंनी टीका करणाऱ्या पक्षांतर्गतील नेत्यांना आणि बाहेरच्या नेत्यांनाही म्हणाले मी आज इथे आहे ते संघर्षाचं फळ आहे.

चर्चा काँग्रेस अध्यक्षपदाची; पण खर्गेंनी सगळ्यांची कुंडलीच मांडली...
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 7:04 PM

नवी दिल्लीः मागील गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Election 2022) आणि उमेदवारांची जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आपल्यावर केल्या जाणाऱ्या आरोपाबद्दल आणि पक्षांतर्गत राजकारणाबद्दल त्यांनी आपली भूमिका टीव्ही नाईनकडे स्पष्ट करताना अनेक मुद्यांन हात घालत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, जे मला गांधी घराण्याचा (Gandhi Family) रबर स्टॅम्प म्हणत आहेत, ते गांधी घराण्याबरोबरच माझाही अपमान करत असल्याची खंत बोलून दाखवली. मी जर अध्यक्ष झाल्यानंतर मी गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर काम करणार असल्याची टीका केल जात आहे.

मात्र त्यांनी आपला राजकीय संघर्ष सांगत ते म्हणाले की, इतकी वर्षे संघर्ष करून मी राजकारणात आलो आहे. मी अगदी ट्रेड युनियनपासून सुरुवात करुन या स्थानापर्यंत पोहचलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी गांधी घराण्याविषयी बोलताना सांगितले की, गांधी घराणे हे काँग्रेस पक्षाचा भाग आहेत.

सोनिया गांधींना अध्यक्षपदाचा 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मी त्यांचे मार्गदर्शन घेईनच. पक्ष वाढीसाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी भाजपबरोबर टक्कर देत आहेत.

त्याबरोबरच शशी थरूर यांच्या पक्षांतर्गत बदलाच्या गोष्टीबद्दलही त्यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले की, थरुर पक्षांतर्गत बदलासाठी ते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. त्यातच आता जर ते बदलाबाबत बोलत असतील तर मात्र त्याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

खर्गे आणि थरुर खुल्या चर्चेसाठी तयार आहेत का असा सवाल केल्यानंतर खर्गे स्पष्ट शब्दातच सांगितले की, हा लढा पक्षांतर्गत नाहीच मुळी. आमचा लढा आहे तो भाजपसोबत, आणि त्यांच्यासोबत आम्ही एकमुखाने लढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपबरोबर आमचा लढा आम्ही सुरुच ठेवणार आहे.

भाजपबरोबर मी संसदेतही वाद घालतो असं सांगत शथी थरुर हे मला माझ्या लहान भावासारखे असल्याचे सांगत आम्ही भाजपबरोबरचा लढा आणखी तीव्र करणार असंही त्यांनी सांगितले.

काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी पक्ष सोडला त्यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. तशी तक्रार सोनिया गांधींकडेही करण्यात आली.

त्यावर बोलताना ते म्हणाले की, जम्मू काश्मिरच्या आझादांनी पक्षात फूट पडल्याचाही आरोप केला होता, मात्र ज्या ईडीची भीती होती, ते पक्षाला सोडून गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. त्यावरुन त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला समाजात फूट पाडण्याची सवय असून त्यासाठीच ते प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.