काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी ‘या’ नावसाठी आग्रही..? खर्गेंनी मात्र जोर निवडणुकीवरच दिला…
सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरूनच मल्लिकार्जुन खर्गे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election 2022) जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशा अनेक अफवांचा गोंधळ माजला आहे. त्यातील एक अफवा म्हणजे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. या गोष्टींवर थेट मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, पक्षाची बदनामी करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरूनच मल्लिकार्जुन खर्गे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची जोरदार चर्चा सुरु होती.
त्यामुळे यावर थेट खर्गे यांनीच या अफवांना सडेतोड उत्तर देत बदनामी करण्यासाठी हे असले प्रकार केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टपण याविषयी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण सहभागी होणारच नसल्याचे सोनिया गांधी याआधीच स्पष्ट केले आहे. आणि त्या कोणत्याही उमेदवारच्या समर्थनासाठी बाहेरही पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सोनियां गांधींनी माझे नाव सुचवले, तेही चुकीचे असून मी हे कधीच म्हटले नाही. यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य या निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेणार नसून अध्यक्ष पदाबाबत यापूर्वीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते असंही त्यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याच नावाचीच चर्चाही सध्या सुरू आहे.
मात्र या सगळ्या चर्चेवर बोलताना खर्गे यांनी सांगितले की, गांधी घराण्याने असो कोणताही उमेदवार जाहीर केला नाही आणि कोणाला पाठिंबाही त्यांनी दर्शवला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या सगळ्या अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसे, मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या समर्थनार्थ मते मिळवण्यासाठी मोठमोठी आश्वासने द्यायलाही त्यांनी सुरुवात केले असल्याचेही बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक जिंकल्यास पक्षातील 50 टक्के पदांवर 50 वर्षांखालील नेत्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले होते.
तर उदयपूरमध्ये झालेल्या घोषणेचीच अंमलबजावणी केली जाणार असून एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील महिला, नेत्यांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याचे त्यांनी अश्वासन दिले होते.