काँग्रेस अध्यक्ष पदाच्या हालचाली तीव्र; शशी थरुरांनी दिले ‘या’ नेत्यासाठी दिले संकेत

देशात काँग्रेस अध्यक्ष पदाची जोरदार चर्चा सुरु असतानाच शशी थरुर यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यामुळे या निवडीकडे आता साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे..

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या हालचाली तीव्र; शशी थरुरांनी दिले 'या' नेत्यासाठी दिले संकेत
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 4:47 PM

नवी दिल्लीः देशाच्या राजकारणात काँग्रेस अध्यक्ष (Congress President Eelction) पदाच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी काही राज्यं राहुल गांधींच्या नावासाठी आग्रही आहेत. हे सुरु असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharur) यांनी अध्यक्ष निवडीपूर्वी सोमवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीचे अजून कारण स्पष्ट झालेले नाही. लोकसभा सदस्य असलेल्या थरूर यांनी अशा वेळी सोनिया गांधी यांची भेट घेतली की त्यांनाच निवडणुका लढविण्यासाठी ते संकेत देऊ पाहत आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जाहीर होणार असून, 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. मात्र एकापेक्षा अधिक उमेदवार असले तर 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

एकीकडे शशी थरुन यांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे तर दुसरीकडे गुजरात काँग्रेसने पक्षनेतृत्वाकडे राहुल गांधींना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसनेही राहुल गांधींच्याच नावाची मागणी करुन तसा ठरावही मंजूर केला आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही राहुल गांधींच्या नावाची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मनीष दोशी यांनी सांगितले की, गुजरात कार्यकारिणीच्या सदस्यांनी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून राहुल गांधींच्या नावाची त्यांनी मागणी केली आहे.

यावेळी भारताच्या भविष्याचाआणि आजच्या काळातील युवकांचा आवाज असलेल्या राहुल गांधी यांनीच काँग्रेस अध्यक्ष पद स्वीकारावे अशीही मागणी काँग्रेसच्या बैठकीत केली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अजून सुरुवात नसतानाच या राहुल गांधींच्या नावासाठी आग्रह धरण्यात आला आहे.

राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवारी राहुल गांधी यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे, तर छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीने रविवारी अशाच प्रकारचा ठराव मंजूर केला आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस आणि झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे यांनीही सोनिया गांधींची भेट घेतली आहे त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना झारखंडमधील राजकीय घडामोडींची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.

काही आठवड्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना पैशांसह पकडण्यात आलं होतं. झारखंड सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.