Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : सोनिया गांधींसाठी काँग्रेस मैदानात, ईडीच्या नोटिशीविरोधात उद्या राज्यभर निदर्शने

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपाय यंत्रणा या मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत.

Congress : सोनिया गांधींसाठी काँग्रेस मैदानात, ईडीच्या नोटिशीविरोधात उद्या राज्यभर निदर्शने
आज सोनिया गांधींची पुन्हा ईडीकडून चौकशी होणार, 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 3:28 PM

मुंबई: लोकशाही मुल्ये व संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा (Modi Government) हुकूमशाही कारभार सुरु असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रासपणे केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gadhi) यांची ईडीमार्फत (ED Enquiry )होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. केंद्र सरकारच्या या जुलूमी, अत्याचारी व हुकूमशाहीविरोधात प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार 21 रोजी मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

 राजकीय द्वेषातून चौकशी

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपाय यंत्रणा या मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत.

नॅशनल हेराल्ड कोणताही गैरव्यवहार नाही

याच प्रकरणात याआधी राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज 10-10 तास चौकशी करण्यात आली. आता सोनिया गांधी यांची चौकशी केली जात आहे. वास्तविक पाहता नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. 2015 साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबाला नाहक त्रास देणे व त्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे. परंतु काँग्रेस पक्ष भाजपा व मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नसून आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देणार असल्याचे सांगितले.

केंद्र सरकार विरोधात राज्यभर आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस केंद्र सरकारच्या मनमानीविरोधात राज्यभर आंदोलन करून ईडीच्या कारवाईचा निषेध करणार आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 10 वाजता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे, यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यात जेथे जेथे ईडी कार्यालये आहेत त्या कार्यालयासमोर तसेच जिल्हा विभागीय कार्यालयासमोरही आंदोलन केले जाणार आहे. नागपूर विभागात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, खासदार सुरेश धानोरकर, अमरावती विभागात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, यशोमती ठाकूर, प्रा. वसंत पुरके, मराठवाडा विभागात प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख, उत्तर महाराष्ट्र विभागात माजी मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री के. सी. पाडवी, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील तर पश्चिम महाराष्ट्र विभागात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हाध्यक्ष, आजी, माजी आमदार, खासदार, पदाधिकारी, सर्व आघाडी संघटना व सेल यांचे प्रमुख व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असे पटोले म्हणाले.

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.