‘या’ राज्यात आज काँग्रेसची ‘शाळा’ भरणार; भारत जोडो यात्रेला अपेक्षेपेक्षा मोठा पाठिंबा; 260 नेत्यांचा सहभाग
काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडूत तीन दिवस थांबल्यानंतर पुढील 19 दिवसासाठी ही यात्रा आता केरळात थांबणार आहे. या यात्रेदरम्याने राहुल गांधी लहान मोठ्या शहरातील स्थानिक लोकांना आणि नेत्यांना भेटणार आहेत, त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत.
नवी दिल्लीः देशाच्या राजकारणात आपल्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसने आता बहुउद्देशीय भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली आहे. तामिळनाडूत काँग्रेसने तीन दिवस काढल्यानंतर आता काँग्रसची भारत जोडो यात्रा 19 दिवस केरळात थांबणार आहे. या दरम्यान केरळातील (Kerala) स्थानिक नागरिकांना आणि विविध भागातील नेत्यांना भेटून ते संवाद साधणार आहेत. यावेळी भारत जोडो यात्रेप्रसंगी काँग्रेसने (Congress) सांगितले की, अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा काँग्रेसला मिळत आहे, त्यामुळे लोकांबरोबर संवाद साधला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तामिळनाडूत गेलेल्या भारत जोडो यात्रेने गेल्या तीन दिवसात 59 किलो मीटरचे आंतर पार केले असल्याचे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले आहे.
As we bid adieu to the land of Thiruvalluvar & Kamaraj, I thank the people of Tamil Nadu for the immense love & support you have given to #BharatJodoYatra?? pic.twitter.com/glgbPzAKis
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 10, 2022
काँग्रेसने आतापर्यंत 73 किलो मीटरची यात्रा पार पाडली आहे. आता तामिळनाडूतच काँग्रेसकडून 59 किलो मीटरची आंतर पार करायचा निर्णय झाला होता तर केरळातील 19 दिवसानंतर मात्र काँग्रेसची ही यात्रा कर्नाटकात जाणार आहे.
RSS-BJP’s product is to divide India. Congress wants to unite India. We will always believe that our unity is because of our diversity.
: Shri @Jairam_Ramesh #BharatJodoYatra pic.twitter.com/Khw5SCoOa4
— NSUI Chhattisgarh (@NSUICG) September 11, 2022
260नेते शाळेत थांबणार
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आज केरळमधील एका शाळेत थांबणार असून त्यांच्यासोबत 230 नेतेही थांबणार आहेत. या नेत्यांची राहण्याची व्यवस्था 60 कंटेनरमधून केली गेली आहे.
म्हणून कंटेनरचा ताफा दुसरीकडे वळवला
यापूर्वी त्रिवेंद्रम जिल्ह्यातील एका कृषी विद्यापीठात कंटेनरचे कॅम्प लावण्यात येणार होते. मात्र काँग्रेसच्या या यात्रेप्रसंगी केरळ सीपीएमच्या विद्यार्थी संघटनेने विरोध करत याविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
आणि काँग्रेसने भारत जोडो यात्रेला कोणत्याही वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कंटेनरऐवजी काँग्रेसच्या राहुल गांधींसह सर्व नेते एका शाळेत मुक्काम करणार आहेत.
मल्याळम भाषेतील गीत
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान, आज काँग्रेस नेत्यांनी भारत जोडो यात्रेचे मल्याळम भाषेतील गीत म्हणण्यास प्रारंभ केले आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या चार दिवसांत पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाला असल्याने राहुल गांधींच्याही भेटीगाठी आता वाढल्या आहेत. तामिळनाडूमध्ये पक्षाला एवढा चांगला प्रतिसाद मिळेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते.
यात्रा ऐतिहासिक ठरणार
त्यामुळे ही भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरणार असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले आहे. ‘या भेटीगाठींच्या कव्हरेज करण्यामध्ये राष्ट्रीय माध्यमांना खूप अडचणी येत असून जे काही कव्हरेज देण्यात येत आहे त्याबद्दलही माध्यमांचे आभार मानण्यात आले आहेत.
राहुल गांधींचे ट्विट
भारत जोडो यात्रेबद्दल राहुल गांधींनीही ट्विट केले आहे की, ‘शिक्षणात स्वातंत्र्य मिळणं, संघटनेच्या माध्यमातून सत्ता मिळणं, उद्योगांमधून समृद्धी मिळण्याबरोबरच नारायण गुरु जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही केरळसारख्या सुंदर राज्यातून प्रवास करत आहोत. त्यामुळे या प्रवासातील प्रत्येक क्षण आम्हाला प्रेरणादायी असेल असं ट्विट त्यांनी केले आहे.
जयराम रमेशांची भाजपवर टीका
जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे. भाजपकडून कधी टी-शर्ट, कधी शूजची चर्चा केली जात आहे भाजप आता अंडरवेअर आणि बनियानवरही चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. तरी पण आमचा प्रवास यशाने सुरू होणार असल्याचे सांगितले.