नोटांची तिजोरी नव्हे, नोटांचा माऊंट एव्हरेस्टच सापडला; कोण आहे धनकुबेर धीरज साहू ?

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यांच्या घरातून इतक्या नोटा सापडल्या की त्या मोजता मोजता तिथली मशीन्सही बिघडली. टॅक्स चोरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील होते.

नोटांची तिजोरी नव्हे, नोटांचा माऊंट एव्हरेस्टच सापडला; कोण आहे धनकुबेर धीरज साहू ?
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 10:48 AM

रांची | 8 डिसेंबर 2023 : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू सध्या बऱ्याच चर्चेत आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन राज्यातील अर्ध्या डझानाहून अधिक जागांवर बुधवारी छापे मारले. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशामधील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (दारू उत्पादन कंपनी) वर छापा टाकला आणि कंपनीशी संबंधित परिसरातून मोठ्या प्रमाणात चलनी नोटा जप्त केल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडच्या रांची आणि लोहरदगा येथे शोध घेण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणाहून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटांची मोजणी करण्यात आली. पण नोटांचा डोंगर इतका प्रचंड होता, की त्या अगणित नोटा मोजता-मोजता मशीनच बंद पडलं. करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साहू यांच्या मालकीच्या अनेक जागांवर छापे टाकले होते.  या कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील होते.

बुधवारी या छाप्यांना सुरूवात झाली आणि खात्याच्या अधिकार्‍यांनी नोट मोजणी यंत्राचा वापर करून रोख रक्कम तपासली, असे सूत्रांनी सांगितले. साहू यांच्या घरात मारलेल्या छाप्यामध्ये सापडलेली सर्व रोकड ही बेहिशोबी असल्याचे दिसते. सापडलेल्या या सर्व नोटा बँकेत नेण्यासाठी तब्बल 157 बॅग्स खरेदी करण्यात आल्या, मात्र शेवटी त्याही कमीच पडल्या. अखेर पैसे नेण्यासाठी तेथे गोण्या आणण्यात आल्या. त्यानंतर सर्व नोटा ट्रकमध्ये भरून बँकेत नेण्यात आल्या.

कोण आहे धीरज साहू ?

धीरज साहू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंड येथून राज्यसभेचे खासदार आहेत. साहू हे स्वत: एक बिझनेसमन असून ते उद्योगपतींच्या कुटुंबातून आले आहेत. धीरज साहू यांचे भाऊ शिव प्रसाद साहू हे देखील खासदार होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच साहू यांचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते. 1977 साली धीरज साहू यांनी राजकारणात पदार्पण केले. 1978 साली जेलभरो आंदोलनादरम्यान त्यांना तुरूंगवासही घडला. जून 2009 साली पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून गेले होते.

धीरज साहू हे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंधित संदेश ते X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असतात. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळल्यानंतर 2020 साली धीरज साहू हे प्रसिद्धीच्या झोतात आले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. 2018 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.