काँग्रेसवरील कारवाई फक्त बदनामीसाठी; जयराम रमेशांचा केंद्रावर हल्लाबोल
काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि रोजच्या प्रश्नांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे.
नवी दिल्लीः राजीव गांधी फाऊंडेशन (RGF) आणि राहुल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील मुख्य प्रश्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई केली गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या संस्थांचे परवाने परवाने रद्द केले आहेत. याबद्दल बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (General Secretary Jairam Ramesh) यांनी सांगितले की, केंद्राने आरजीएफ आणि आरजीसीटीवर जुन्या आरोपांचीच पुनरावृत्ती केली आहे.
काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि रोजच्या प्रश्नांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आहे. त्यामुळे त्याच्यावर उठवलेल्या आवाजामुळेच भाजपने ही खेळी खेळल्याचे म्हटले आहे
काँग्रेस पक्षाने सांगितले आहे आहे की, कारवाई केलेल्या या दोन्ही संस्था माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर स्थापन करण्यात आल्या आहेत.
सद्भावना आणि सर्वसमावेशक, शाश्वत विकासाच्या विचारांसाठी त्या काम करतात. जयराम रमेश म्हणाले, ट्रस्टकडून नेहमीच धर्मादाय आणि इतर सर्व कायदे आणि नियमांचे पालन करतच त्याचा प्रवास सुरु आहे.
केंद्र सरकारने आज काँग्रेसच्या नेतृत्वाखालील असलेल्या दोन्ही एनजीओंचे परवाना रद्द केले आहेत. त्यामध्ये या दोन एनजीओंचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामध्ये राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांचा समावेश आहे.
या स्वयंसेवी संस्थांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाने ही कारवाई करण्यात आली असली तरी ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याची टीका त्यांनी केली आहे.
याबाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, या एनजीओ चीनमधून पैसे येत होते, त्यामुळे सरकारकडून त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.