अहमद पटेलांच्या निधनाने कोषाध्यक्षपद रिक्त, ‘चाणक्या’ची पोकळी भरण्यासाठी काँग्रेसमध्ये तिघे शर्यतीत

काँग्रेस पक्षाचा कोषाध्यक्ष आणि संघटन स्तरावरील कामाची जबाबदारी सोनिया गांधी यांच्या निर्णयानंतर नक्की होईल.

अहमद पटेलांच्या निधनाने कोषाध्यक्षपद रिक्त, 'चाणक्या'ची पोकळी भरण्यासाठी काँग्रेसमध्ये तिघे शर्यतीत
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 1:25 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काँग्रेसचे ‘चाणक्य’ अशी ख्याती असलेल्या अहमद पटेल यांच्याकडे पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये कोषाध्यक्ष आणि संघटन पद कोणाला द्यायचे, याबाबत जोरदार मंथन सुरु झाले आहे. (Congress to decide about Party Treasurer after Demise of Ahmed Patel)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या नावांवर पक्षात जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाचा कोषाध्यक्ष आणि संघटन स्तरावरील कामाची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्णयानंतर नक्की होईल.

काँग्रेसचा ‘चाणक्य’ हरपला

काँग्रेसचं पहिल्या फळीतील मोठं नाव, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं काल (26 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास निधन झालं. अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते.

पटेल यांची ऑगस्ट 2018 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक कमान सांभाळण्याचं मोठं काम केलं आहे.

सत्ता उपभोगण्यापेक्षा पक्षसंघटनेवर भर

इंदिरा गांधींच्या काळात 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली होती. त्यावेळी काँग्रेसच्या मूठभर विजयी उमेदवारांमध्ये अहमद पटेल यांचं नाव होतं. पुढे 1980 मध्ये काँग्रेसनं दमदार पुनरागमन केलं. त्यावेळी इंदिरा गांधी अहमद पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्यास इच्छुक होत्या. पण पटेल यांनी आपण संघटना मजबूत करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत पक्षासाठी काम करणं पसंत केलं.

त्यानंतर राजीव गांधी यांनीही 1984 च्या निवडणुकीनंतर पटेल यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. तेव्हाही पटेल यांनी ते विनम्रपणे नाकारत पक्षासाठी काम करण्यालाच पसंती दिली. राजीव गांधी यांच्या काळात अहमद पटेल यांनी काँग्रेसमध्ये युवकांचं संघटन बांधलं. त्याचा मोठा फायदा पुढे सोनिया गांधी यांना झाला. (Congress to decide about Party Treasurer after Demise of Ahmed Patel)

संबंधित बातम्या :

अहमद पटेल यांचं दु:खद निधन, गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसचे संकटमोचक हरपले : मंत्री अशोक चव्हाण

(Congress to decide about Party Treasurer after Demise of Ahmed Patel)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.