नवी दिल्लीः देशात वाढणाऱ्या महागाई, बेरोजगारी (Inflation, unemployment) आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) (C0ngress) विरोधात काँग्रेसकडून आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅली काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, नुकताच काँग्रेसमधून आपल्या पदावरुन मुक्त झालेले गुलाम नबी आझाद पहिल्यांदाच जम्मूमध्ये जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळासह साऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. देशात सर्वत्र महागाई, बेरोजगारी वाढत आहे, त्याबद्दल वेळोवेळी काँग्रेसकडून आवाज उठविण्यात आला तरी आज पुन्हा जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) विरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली (Rally at Ramlila Maidan) काढण्यात येणार आहे. या आंदोलनात देशातील अनेक मोठ मोठे नेते हजेरी लावणार असून राहुल गांधींसह काँग्रेसमधी वरिष्ठ नेते संबोधित करणार आहेत.
त्यामध्ये दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह देशातील इतर भागांतील कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. देशातील बडे बडे नेते आज काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे रामलीला मैदानावर कडकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून महागाई आणि बेरोजगारीमुळे सवाल उपस्थित करण्यात येत आहे, महागाई आणि बेरोजगारी हा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत हा प्रश्न असल्याने त्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे यासाठी काँग्रेस आग्रही आहे. महागाई आणि बेरोजगारीबद्दल राहुल गांधी यांनी फेसबुकवर लिहिले होते की, आज देशासमोरील सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारी, महागाई आणि समाजात वाढणारा द्वेष आहे.
तर त्याचवेळी शनिवारी काँग्रेसकडून केंद्र सरकारकडून महागाई आणि बेरोजगारीसारख्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून या विषयावर आपण आवाज उठवत राहू असंही त्यांनी म्हटले होते.
देशातील महागाई आणि बेरोजगारीवर काँग्रेसकडून जोरदारपणे आवाज उठवला जात असतानाच दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद आज जम्मूमध्ये पहिल्यांदाच जाहीर सभा घेत आहेत, त्या सभेलाही ते संबोधित करणार आहेत. यादरम्यान ते त्यांच्या नव्या पक्षाची घोषणाही करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी त्या राजीनाम्यामध्ये काँग्रेस नेतृत्त्वावर टीका केली होती, त्यामुळे आझाद यांच्याकडून आजही काँग्रेस नेतृत्त्वावर हल्ला होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राहुल गांधी यांच्या रॅलीच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या आझादांच्या जाहीर सभेतून आणखी काही खुलासा होणार का याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गुलाम नबी आझादांकडून आगामी काळात ते गांधी घराण्यावर हल्ला अधिक तीव्र होणार असल्याचेही बोलले जात आहे.
शनिवारी झालेल्या एका पुस्तक प्रकाशप्रसंगी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत सांगितले होते की, राजकारणातील विरोधकांना भेटले म्हणजे त्याचा डीएनए काही बदलत नसल्याचे मत व्यक्त केले होते. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. त्यावर काँग्रेसने पलटवार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच आझादांचा रिमोट कंट्रोल असून त्यांचा डीएनए ‘मोदीमय’ झाल्याची टीका केली होती. त्यामुळे आज दिवसभरातील या दोन महत्त्वाच्या घडामोडींकडे काँग्रेससह विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे.