Congress President : काँग्रेसला मिळणार लवकरच नवा अध्यक्ष; प्रियंका गांधी की गांधी घराण्याबाहेरील आणखी कोणी?
काँग्रेसच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आता लवकरच काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड येत्या 20 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या (congress) गोटातून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आता लवकरच काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड येत्या 20 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पु्न्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हातात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे काँग्रसचे नवे अध्यक्ष कोण असणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रियंका गांधींकडे (Priyanka Gandhi) देण्यात यावी अशी मागणी काही काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे प्रियंका गांधी या काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला यावेळी अध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते अशी देखील एक चर्चा आहे. सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. मात्र त्या प्रकृतीच्या कारणांमुळे काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता लवकरच काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यात आहे.
राहुल गांधी यांचा नकार?
सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्या अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहेत. त्या लवकरच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर 20 सप्टेंबरपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा राहुल गांधी हेच पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील अशी शक्यता होती. मात्र राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियकां गांधींकडे जाणार की गांधी घराण्याबाहेरील एखादी व्यक्ती काँग्रेसचा नवा अध्यक्ष होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रियंका गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी
दरम्यान दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांकडून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे अशी मागणी होत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती पहाता प्रियंका गांधी याच काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. 20 सप्टेंबरपर्यंत काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळू शकतो.