Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बक्षिसाचे 20 लाख हडप करण्यासाठी कट, जम्मू-काश्मीरमधील बनावट चकमकप्रकरणी मोठा खुलासा

जम्मू काश्मीरमधील शोपियांमध्ये (Shopian) मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या कथिक बनावट चकमकीप्रकरणी मोठा खुलासा झालाय.

बक्षिसाचे 20 लाख हडप करण्यासाठी कट, जम्मू-काश्मीरमधील बनावट चकमकप्रकरणी मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 12:58 AM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियांमध्ये (Shopian) मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या कथिक बनावट चकमकीप्रकरणी मोठा खुलासा झालाय. आरोपी सैन्य अधिकाऱ्याने 2 नागरिकांसोबत मिळून बक्षिसाचे 20 लाख रुपये (Prize Money) हडप करण्यासाठी हा संपूर्ण चकमकीचा बनाव रचल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणी सैन्याने संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही केली आहे (Conspiracy of fake Encounter by Army Captain in Jammu Kashmir to win 20 Lack Prize).

या कथित बनावट चकमकीत शोपियांमधील 3 युवकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपपत्र दाखल केलं आहे. यानुसार आरोपी कॅप्टनने सैनिकांनी संबंधित परिसराचा घेराव करण्याच्या पीडित तरुणांवर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी कॅप्टन (Accused Caption) भूपिंदर सिंह सध्या सैन्याच्या ताब्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर लवकरच कोर्ट मार्शलची कारवाई होणार आहे. ही बनावट चकमक 18 जुलै 2020 रोजी अम्शीपुरा येथे झाली. यात राजौरी जिल्ह्यातील 3 युवकांचा मृत्यू झाला. इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इबरार अशी या युवकांची नावं आहेत.

बक्षिसाची रक्कम हडप करण्यासाठी कट

जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तबीश नजीर आणि बिलाल अहमद लोन नावाच्या दोघांच्या नावाचाही उल्लेख आहे. हे दोघे देखील आरोपी कॅप्टनच्या कटात सहभागी होते. यापैकी बिलाल अहमद लोन आता सरकारी साक्षीदार बनला आहे. आरोपी कॅप्टनवर अफ्सपा 1990 कायद्यातील अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आणि सैन्यदल प्रमुखांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न करण्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

आरोपपत्रात 75 साक्षीदारांची यादी

जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणात तपास करुन आरोपपत्र दाखल केलंय. हे आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी 75 साक्षीदारांची यादी दिली आहे. याशिवाय आरोपींच्या मोबाईल कॉल डेटा आणि इतर तांत्रिक माहिती देखील सादर करण्यात आलीय. आरोपपत्रात 4 सैनिकांचाही जबाब नोंदवण्यात आलाय. सूबेदार गारू राम, लांस नायक रवि कुमार, शिपाई अश्विनी कुमार आणि योगेश अशी त्यांची नाव आहेत. ते चकमकीच्या दिवशी कॅप्टनच्या पथकाचा भाग होते. त्यांनी घेरावाच्या आधीच कॅप्टनने गोळ्या झाडल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा :

शोपियां बनावट चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल, 3 आरोपींमध्ये सैन्यातील कॅप्टनचाही समावेश

सीमेवर शत्रूच्या हल्ल्यापेक्षाही अधिक जवानांचा जीव घेणारं ‘हे’ कारण, अहवालात खुलासा

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

Conspiracy of fake Encounter by Army Captain in Jammu Kashmir to win 20 Lack Prize

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....