Veer Savarkar : बुलबुल पक्ष्याच्या पंखावर बसून सावरकर देशभ्रमंती करायचे; पाठ्यपुस्तकात अजब दावा
पाठ्यपुस्तकात वीर सावरकरांबद्दल (Veer Savarkar) छापलेल्या एका मजकुरामुळे पुन्हा एकदा कर्नाटक सरकार (Karnataka Government) चर्चेमध्ये आले आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारने अभ्यासक्रम संशोधनानंतर इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये सावरकरांबद्दल काही मजकूर समाविशिष्ट केला आहे.
नवी दिल्ली : पाठ्यपुस्तकात वीर सावरकरांबद्दल (Veer Savarkar) छापलेल्या एका मजकुरामुळे पुन्हा एकदा कर्नाटक सरकार (Karnataka Government) चर्चेमध्ये आले आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारने अभ्यासक्रम संशोधनानंतर इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये सावरकरांबद्दल काही मजकूर समाविशिष्ट केला आहे. या मजकुरामुळे वाद निर्माण होऊ शकतो. या पुस्तकामध्ये असे म्हटले आहे की सावरकर जेव्हा अंदमानच्या जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेव्हा ते बुलबुल पक्ष्याच्या पंखावर बसून देशभ्रमंती करत असत. आठवीच्या पुस्तकात पहिल्यापासून सावरकरांबद्दलच्या या ओळी समाविशिष्ट करण्यात आल्या नव्हत्या, तर अभ्यासक्रम संशोधनानंतर या ओळी आठवीच्या पुस्तकात जोडण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारने पुस्तकात छापलेल्या या ओळी आता चांगल्याच व्हायरल होत आहेत. याबाबत आजतक या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभ्यासक्रम संशोधनाची जबाबदारी रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील कमेटीकडे सोपवण्यात आली होती.
पुस्तकामध्ये नेमकं काय म्हटलं?
वीर सावरकर यांना ज्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते, त्या कोठडीत प्रकाश येण्यासाठी एक साधी छोटी खिडकी देखील नव्हती. मात्र त्या कोठडीमध्ये कुठून तरी बुलबुल पक्षी येत असत. त्या पक्ष्यांच्या पंखावर बसून सावरकर दररोज देशभ्रमंती करत, असा अजब दावा कर्नाटक सरकारने इयत्ता आठवीच्या कन्नड भाषेच्या पाठ्यपुस्तकात केला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये वीर सावरकरांबद्दल छापून आलेल्या या ओळी आता चांगल्याच व्हायरल होत असून, यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. सुरुवातीला या ओळी छापण्यात आल्या नव्हत्या. मात्र जेव्हा अभ्यसक्रमाचे संशोधन करण्यात आले तेव्हा सावरकरांबद्दलचा हा मजकूर त्यामध्ये छापण्यात आला आहे.
इयत्ता आठवीचे पुस्तक
मीडिया रिपोर्टनुसार ज्या पुस्तकात सावरकरांबाबत हा अजब दावा करण्यात आला आहे. ते पुस्तक इयत्ता आठवीचे कन्नड भाषेचे आहे. कर्नाटकमध्ये कन्नड ही दुसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांना शिकवली जाते. या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाची जबाबदारी रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील कमेटीकडे सोपवण्यात आली होती. संशोधनानंतर पाठ्यपुस्तकात या मजकुराचा समावेश करण्यात आला आहे