Omicron च्या आठ नव्या व्हेरिएंटमुळेच कोरोनाचा आलेख वाढला; गेल्या 24 तासात 2380 नव्या रुग्णांची नोंद, चौथी लाट येणार ?
देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांची तपासणी केल्यानंतर तज्ज्ञांकडून असे सांगण्यात आले आहे की, दिल्लीत गेल्या चोवीस तासात 2380 रुग्णांची नोंद झाली असून त्यासंदर्भात आता नवीन संशोधन चालू आहे.
नवी दिल्लीः आरोग्य मंत्र्यालयाच्या माहितीनुसार दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. आणि या वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत ओमिक्रॉनचे नवे आठ व्हेरिएंट (Eight variants) जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीमध्ये जिनोम सिक्वेंसिंगमध्ये ओमिक्रॉनमध्ये (Omicron) BA.2.12.1 या व्हेरिएंटबरोबरच आणखी नव्या एका व्हेरिएंटची माहिती समोर आल्याचेही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांची तपासणी केल्यानंतर तज्ज्ञांकडून असे सांगण्यात आले आहे की, दिल्लीत गेल्या चोवीस तासात 2380 रुग्णांची नोंद झाली असून त्यासंदर्भात आता नवीन संशोधन चालू आहे.
एलबीएस रुग्णालयाचे (LBS Hospital) अधिष्ठाता डॉ. एस. के. सरीन यांनी सांगितले की, ओमिक्रॉनचे नवे 8 व्हेरिएंट मिळाले असून आमच्या रुग्णालयात त्याच्यावर संशोधन सुरु आहे. त्या 8 व्हेरिएंटपैकी 1 व्हेरिएंट गंभीर परिणाम करणारा आहे, त्यामुळे त्याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यताही एलबीसी रुग्णालयाकडून व्यक्त केली जात आहे.
देशाच्या राजधानातील आरोग्य विभागाच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, दिल्लीत ज्या वेगाने कोरोना वाढत आहे, त्याला कारण फक्त ओमिक्रॉनमध्ये तयार झालेले जे 8 व्हेरिएंट आहेत, त्याच्या परिणामामुळे दिल्लीतील कोरोनाची संख्या वाढत आहे असे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील जिनोम सिक्वेंसिंगमधील ओमिक्रॉनच्या BA.2.12.1 या व्हेरिएंटबरोबरच आणखी एका नव्या व्हेरिएंटचा शोध लागला आहे.
There’s a possibility that new variants of Omicron are emerging. Many samples were sequenced at ILBS. I think there’re 8 variants of Omicron, which one is the dominating variant,we’ll know soon: Dr SK Sarin, Director, Institute of Liver&Biliary Sciences,on Delhi Covid cases surge pic.twitter.com/HtAMlOYwFD
— ANI (@ANI) April 21, 2022
नव्या व्हेरिएंटमुळे संख्या वाढली
या नव्या व्हेरिएंटच्या साथीमुळेच देशाच्या राजधानीत कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, आणि कोरोनाची साथ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दिल्लीत परिस्थिती गंभीर
राजधानी दिल्लीत मागील चोवीस तासात कोरोनाचे 1009 रुग्णांची नोंद झाली आहे, तर यामध्ये एकाची मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. तर मंगळवारी 601 तर त्यापेक्षा बुधावारीही ही संख्या वाढतानाच दिसून आली. मंगळवारी ज्यावेळी कोरोना संक्रनाची टक्केवारी काढण्यात आली त्यावेळी ती 4.42 टक्के होती, तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 5.70 टक्यावर ही वाढ गेली होती.
आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू
गेल्या काही तासात भारतात एका दिवसात कोविड-19 चे रुग्ण 2380 रुग्णांची संख्या झाल्यानंतर ज्यावेळी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 49 हजार 974 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. तर आता हीच संख्या वाढून 13, 433 इतकी संख्या झाली आहे. तर केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती त्यातील 56 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
24 तासाच हजारच्या पार रुग्ण
तर आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 5 लाख 22 हजार 062 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या दिल्लीत चोवीस तासात 1093 कोरोनाचे रुग्ण झाले असून बरे होऊन घरी जाणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. रुग्ण बरे होण्याचा आकडाही 98.76 असला तरी सरकारकडून पुन्हा कोरोनाच्या सूचना पाळण्याचे संकेत दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
Chandrakant Patil: राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग आवरा, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना आवाहन
KDMC : कल्याण-डोंबिवलीतील एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश