देशभरात ‘ग्रीन झोन’मधील जिल्ह्यात कोणकोणत्या क्षेत्रात अंशत: सूट?

शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग, सर्व आरोग्य सेवा यामध्ये ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना अंशत: सवलत मिळणार आहे (Corona Green Zone Relaxations)

देशभरात 'ग्रीन झोन'मधील जिल्ह्यात कोणकोणत्या क्षेत्रात अंशत: सूट?
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 9:36 AM

नवी दिल्ली : ‘कोरोना’चा संसर्ग नसल्याने ‘ग्रीन झोन’मध्ये मोडणाऱ्या देशभरातील जिल्ह्यांत आजपासून संचारबंदीत काहीशी सूट मिळणार आहे. लॉकडाऊन आणि जिल्हाबंदी 3 मेपर्यंत कायम राहणार असल्याने नागरिकांना अद्यापही घरातच राहायचे आहे. मात्र उद्योग आणि शेतीशी निगडीत काही कामांना अंशतः सवलत मिळणार आहे. कमीत कमी आणि स्थानिक कर्मचारीवर्ग तसेच सोशल डिस्टन्सिंगची सक्ती पाळणे बंधनकारक आहे. (Corona Green Zone Relaxations)

संचारबंदीपासून सूट मिळणारी क्षेत्र

– शेतकाम आणि शेतीशी निगडीत – सर्व आरोग्य सेवा, आयुष सेवा – मनरेगाचे काम सुरु, मात्र सोशल डिस्टन्सिंगची सक्ती – शेतीची अवजारे, सप्लाय चेनची कामे सुरु – औषध निर्मिती करणाऱ्या कंपनी आणि वैद्यकीय साधने तयार करणारे कारखाने – चहा, कॉफी आणि रबर प्लांटेशन कामाला सूट, पण 50 टक्के कर्मचारीच काम करणार – तेल आणि गॅस क्षेत्राशी संबंधित सर्व कामकाज – पोस्ट सेवा आणि पोस्ट ऑफिस खुले – गौशाला आणि जनावरांचे शेल्टर होम (Corona Green Zone Relaxations) – आवश्यक सेवांच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रित असणार – बांधकामाला परवानगी – हायवे ढाबा, ट्रक दुरुस्ती दुकान आणि सरकारी कॉल सेंटर – इलेक्ट्रीशियन, आयटी रिपेअरिंग, प्लंबर, मोटर मॅकेनिक, कारपेंटर आणि तत्सम स्वयंरोजगाराला परवानगी – ग्रामीण भागातील उद्योगांना परवानगी. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक – रात्रीपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देशात टोलवसुली सुरु

देशभर काल कोरोना रुग्णांत 10 टक्क्यांनी मोठी वाढ झाली. देशात काल 1612 नवे रुग्ण वाढले. महाराष्ट्रात 552 तर गुजरातेत 367 नवे रुग्ण सापडले. उत्तर प्रदेशातही काल 179 नव्या रुग्णांची भर पडली. भारतात सध्या कोरोनाचे 17 हजार 325 रुग्ण आहेत. देशभर काल 39 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून एकूण 560 ‘कोरोना’बळी गेले आहेत.

(Corona Green Zone Relaxations)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.