कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह पत्रकार, तब्बल 200 पत्रकार आणि राजकारण्यांची उपस्थिती
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेतील सर्व पत्रकारांना क्वारंटाईन करण्यात आले (Kamalnath quarantine himself coronavirus) आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेतील सर्व पत्रकारांना क्वारंटाईन करण्यात आले (Kamalnath quarantine himself coronavirus) आहे. कमलनाथ यांची 20 मार्च रोजी भोपाळ येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतील एका पत्रकाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या पत्रकारालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत किमान 200 पत्रकार उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे.
पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यासोबत पत्रकार परिषदेतील उपस्थित नेत्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत कमलनाथही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे.
“पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच कमलनाथ यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे”, अशी माहिती कमलनाथ यांचे पीआर नरेंद्र सलूजा यांनी दिली.
पत्रकार परिषदेत भोपाळसह दिल्लीच्या पत्रकारांचा समावेश
कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत भोपाळसह दिल्लीचेही पत्रकार उपस्थित होते. त्यामुळे पत्रकार परिषदेत उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकारांना क्वारंटाईन केले जाणार आहे.
पत्रकाराला कोरोना झाल्याचे आजच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पत्रकाराच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेत आहे. त्यासोबत या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे बडे नेते आणि आमदारही उपस्थित होते यांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे.
पत्रकाराची 26 वर्षीय मुलगी 17 मार्च रोजी लंडनहून दिल्ली एअरपोर्ट पोहोचली होती. यावेळी एअरपोर्टवर तपासणी केली असता ती फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर ती शताब्दी एक्स्प्रेसने भोपाळला आली. यानंतर शेजारच्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तिची कोरोनाची तपासणी करावी, अशी मागणी केली. यानंतर जेपी रुग्णलयाच्या डॉक्टरांनी घरी येऊन तरुणीच्या घशातील नमुने घेऊन तपासणी केली असता तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये 15 कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. देशात एकूण 550 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास 40 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
चीनमधील ‘हुबेई’चे लॉकडाऊन 60 दिवसांनंतर हटवले, नागरिकांच्या साथीने ‘कोरोना’ आटोक्यात
Corona | होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला, कोल्हापूरच्या दीडशहाण्यावर गुन्हा