नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा एकदा अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातील 1 लाख अॅक्टिव रुग्ण चिंता वाढवत आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणावरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या राज्यात आरोग्य मंत्रालयाच्या 3 बैठका झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.(rise in corona patients in the country once again, the central government concerned)
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात वाढत्या कोरोना केसेसमुळं चिंता वाढत आहे. यातून आपल्या दोन गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्यातील एक म्हणजे कोरोना विषाणूबाबत बेजबाबदार बनू नका आणि दुसरा म्हणजे आपल्याला अजूनही कोरोना नियमांचं पालन करावंच लागेल. महाराष्ट्रात सर्वात खराब ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव दिसत नाही. पण कमी चाचण्या आणि कोरोना नियमांचं मोठ्या प्रमाणात होत असलेलं उल्लंघन होत असल्याचं ICMR चे डीजी डॉ. बलराम भार्गवर यांनी म्हटलंय. तर कोणत्याही राज्यात कोरोना लसीची कमतरता नसल्याचंही केंद्राने म्हटलंय.
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत समोर आलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत या राज्यांची टक्केवारी तब्बल 85.91 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे एकूण 22 हजार 854 नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 13 हजार 659 रुग्ण (म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास 60 टक्के) एकट्या महाराष्ट्रात सापडले आहे. त्यानंतर केरळमध्ये 2 हजार 475, आणि 1 हजार 393 रुग्ण आढळले आहेत. भारतात सध्या 1 लाख 89 हजार 226 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत बदल होत आहे. केरळमध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या घटत आहे. तर महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
संबंधित बातम्या :
नागपूरमध्ये लॉकडाऊन, कल्याण- डोंबिवलीत 7 ते 7 निर्बंध, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती काय?
rise in corona patients in the country once again, the central government concerned