भोपाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात अक्षरश: थैमान घातलंय. या काळात अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. काहिंच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेला. अशावेळी दिल्लीतील केजरीवाल सरकार पाठोपाठ आणि मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारनेही मोठा निर्णय घेतलाय. कोरोना काळात ज्या कुटुंबाने आपल्या घरातील सदस्य गमावला, अशा कुटुंबाला सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलीय. चौहान यांच्या या घोषणेमुळे कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना काहिसा आधार मिळणार आहे. (1 lakh assistance to the relatives of those who died due to corona, Decision of Madhya Pradesh Government)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मध्य प्रदेशातही थैमान घातलं आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. त्या सर्वांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार 1 लाख रुपयांची मदत करणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी संध्याकाळी ही घोषणा केली आहे.
Families who had a death due to #COVID19 among them will be given Rs 1 Lakh each as ex-gratia from the state government: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan
(File pic) pic.twitter.com/blbdnXRSBR
— ANI (@ANI) May 20, 2021
अनेक कुटुंबांमध्ये तर घरातील कर्ता माणूसच कोरोनामुळे मृत्यू पावल्यानं उपासमारीची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने अशा कुटुंबांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी (18 मे) पत्रकार परिषद घेत 4 मोठ्या घोषणा केल्या. यात कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिलाय. तसेच ज्या घराती कर्ता माणूस गेला त्या कुटुंबाला पेन्शनचीही घोषणा केली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “दिल्लीत अनेक कुटुंबांमध्ये कमावणाऱ्या व्यक्तीचाच कोरोनामुळे मृत्यू झालाय. अनेक मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचं छत्र हरलंय. दुसरीकडे अनेक आईवडिलांच्या कमावणाऱ्या मुलांचा मृत्यू झालाय. अशा कुटुंबांना कशी मदत करता येईल यावर दिल्ली सरकार विचार करत होती. आज यावरील निर्णयांची घोषणा करत आहोत.”
1. ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. संकटाच्या काळात मदत म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार.
2. ज्या कुटुंबातील कमावती व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्या कुटुंबांना दरमहा 2500 रुपयांची पेन्शन दिली जाणार.
3. ज्या मुलांना कोरोनामुळे आपले आई वडील गमवावे लागलेत त्यांना दरमहिना 2500 रुपये पेन्शन देणार. तसेच त्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करणार.
4. दिल्लीतील केजरीवाल सरकार 72 लाख रेशनधारकांना दर महिन्याला 5 किलो रेशन देते. या महिन्यात केंद्र सरकार देखील 5 किलो देणार आहे. या महिन्यातील रेशन मोफत असणार आहे.
संबंधित बातम्या :
Remedesivir : कोरोना रुग्णावरील उपचारासाठी आता रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नाही – WHO
ब्लॅक फंगस पाठोपाठ आता व्हाईट फंगसची लागण, म्युकरमायकोसिसपेक्षाही जास्त जीवघेणं, कोणाला धोका?
1 lakh assistance to the relatives of those who died due to corona, Decision of Madhya Pradesh Government