CORONA UPDATE | पंजाबमध्ये रात्री संचारबंदी, दंडाच्या रकमेतही मोठी वाढ!, महाराष्ट्रातही कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता

दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पंजाबमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी कडक धोरण अंवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्रीच्यवेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CORONA UPDATE | पंजाबमध्ये रात्री संचारबंदी, दंडाच्या रकमेतही मोठी वाढ!, महाराष्ट्रातही कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 4:29 PM

चंदीगड: राजधानी दिल्लीतील गंभीर स्थिती आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पंजाब सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदीचा आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून पंजाबमधील सर्व विभाग आणि शहरांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात येईल. सोबतच मास्क न वापरणारे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.(Night curfew in Punjab against the backdrop of corona)

दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पंजाबमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी कडक धोरण अंवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्रीच्यवेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार रात्री 9.30 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. तर संचारबंदी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दुसरीकडे मास्क न वापरणाऱ्यांकडून आता 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंडाची वसूली केली जाणार आहे.

महाराष्ट्रातही निर्बंध कडक होण्याचे संकेत

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्यानं राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून, निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्यानं राज्य सरकार हा कठोर निर्णय घेणार आहे. यावर पुढच्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कडक निर्बंध लादण्याचा विचार सरकार करत असल्याचं म्हटलंय. राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं असल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई ही कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथं लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लादले जाणार?, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढली, पुन्हा निर्बंध लावणार, राजेश टोपेंचा कडक इशारा

Night curfew in Punjab against the backdrop of corona

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.